28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाभेसळीसाठी साठविलेला २ कोटी २४ लाखाचा लवंग कांडीचा साठा जप्त

भेसळीसाठी साठविलेला २ कोटी २४ लाखाचा लवंग कांडीचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाने तुर्भे येथे केला जप्त

Google News Follow

Related

अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मे. रिषी कोल्ड स्टोरेज, तुर्भे एमआयडीसी येथे अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६अंतर्गत तपासणी केली असता, तेथील कोल्ड स्टोरेजमध्ये हलक्या दर्जाचे मसाले पावडर व लवंग पावडर तयार करण्यासाठी व लवंगमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लवंग कांडीचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला आढळला. तपासणीनंतर लवंग कांडीचा १६०१११  किलोचा साठा जप्त करण्यात आला असून जप्त लवंग कांडीच्या साठ्याची एकूण किंमत २ कोटी २४ लाख १५ हजार ५४० रुपये इतकी आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

 

हे ही वाचा:

वॅग्नरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन मॉस्को विमान अपघातात ठार की काटा काढला?

चांद्रयानचा सोशल मीडियाच्या अंतराळातही ‘विक्रम’

उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार

तेजस विमानातून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

जप्त केलेला साठा मे. जी. टी. इंडिया प्रा. ली., शॉप नं. बी-५१, एपीएमसी मार्केट, वाशी या आस्थापनेचा असल्याचे उघडकीस आले. हा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याचे आढळून आले. या साठ्यातून एकूण ०७ लवंग कांडीचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. अन्न नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून सदर अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी विभागाचा कार्यभार घेताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून अन्न पदार्थाच्या भेसळीच्या अनुषंगाने कडक कारवाई घेण्याचे आदेश नुकतेच दिलेले होते. त्यानुसार प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार व कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (दक्षता/गुप्तवार्ता) उल्हास इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंदकुमार खडके, राहुल ताकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा