रविवारी एनआयएला अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. मुंबई येथील मिठी नदीत हे पुरावे सापडले आहेत. सचिन वाझे याने हे पुरावे नष्ट करायच्या हेतूने मिठी नदीत टाकले होते. पण मनसुख हिरेन यांची हत्या होईपर्यंत हे पुरावे वाझेच्याच ताब्यात असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. मनसुख ह्याच्या हत्येनंतरच वाझेने हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख प्रकरणाचा तपास करत असताना सचिन वाझेने या प्रकरणाशी संबंधित काही महत्वाचे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केल्याची बाब एनआयएच्या समोर आली होती. यातले काही पुरावे मुंबई येथील बीकेसी परिसरात मिठी नदीत फेकल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. रविवारी एनआयएचे पथक सचिन वाझेला घेऊन मिठी नदी परिसरात पोहोचले. यावेळी सचिन वाझेच्या उपस्थिती उतरून तपास करण्यात आला. एनआयएच्या या प्रयत्नाला यश आले आहे.
हे ही वाचा:
मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे
कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक
वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ
लॉकडाऊनच्या तयारीला लागा…मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
एनआयएच्या या तपासात गाडीच्या दोन नंबरप्लेट्स सापडल्या आहेत. या दोन्ही नंबरप्लेट्सचा नोंदणी क्रमांक एकच आहे. या सोबतच कॉम्पुटरचा सीपीयू, डीव्हीआर आणि इतर काही गोष्टी सापडल्या आहेत. सापडलेले डीव्हीआर हे वाझे राहात असलेल्या इमारतीचे आहेत जिथे १७ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत मनसुखची स्कॉर्पिओ उभी होती. यासोबत काही दुकानांचेही फुटेज आहे जिथे वाझेने वेगवेगळ्या नंबरप्लेट्स बनवून घेतल्या. हे सर्व पुरावे मनसुख ह्याच्या हत्येपूर्वी वाझे याच्याच ताब्यात असल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
These pieces of evidence were in Waze’s custody till the time of Mansukh’s death: NIA sources (3/3)
— ANI (@ANI) March 28, 2021