उत्तराखंडच्या उत्तराकाशीमध्ये रविवार, २० ऑगस्ट रोजी रात्री भीषण अपघात झाला आहे. गंगोत्रीधामवरुन ही बस भाविकांना घेऊन परतत होती. ३३ भाविकांनी भरलेली बस दरीमध्ये कोसळली. या भीषण अपघातामध्ये सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर २८ जण जखमी झाले असून त्यांना वाचविण्यात यश आले आहे. रेस्क्यू करण्यात आले आहे.
गंगोत्री महामार्गावर गंगनानीजवळ हा भीषण अपघात झाला. ३३ प्रवाशांना घेऊन बस गंगोत्रीवरुन उत्तरकाशीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीमध्ये कोसळली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २८ जखमींना वाचविण्यात आले आहे. तर ७ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील प्रवासी गुजरातचे असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
बद्रीनाथ महामार्गावरील ७० मीटरचा रस्ता खचला
भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार
रजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो
रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी यांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शोक व्यक्त केला आहे. अपघातानंतर उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी अभिषेक रुहेला आणि पोलिस अधिक्षक अर्पण यदुवंशी मदत कार्याची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच गरज पडल्यास जखमींना दुसऱ्या आरोग्य केंद्रात नेण्यासाठी हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहे.