31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरक्राईमनामामुंबईतून १५ कोटींचा कोकेन साठा जप्त

मुंबईतून १५ कोटींचा कोकेन साठा जप्त

महसूल गुप्तचर संचालनायाची कारवाई

Google News Follow

Related

महसूल गुप्तचर संचालनालयाने अमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या मोहीमेअंतर्गत मोठे यश मिळवले आहे. डीआरआयने १८ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत आदिस अबाबाहून विमानाने मुंबईत आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून १४९६ ग्रॅम इतका कोकेनचा साठा जप्त केला. याचे अंदाजीत बाजार मूल्य १५ कोटी रुपये इतके आहे.

 

डीआरडीआयला याबाबत आधीपासूनच माहिती असल्याने, सातत्यपूर्ण चौकशी आणि पाळत ठेवली गेली होती. त्यानंतर अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ही नियोजनपूर्वक कारवाई केली गेली. या प्रवाशाच्या हालचाली संशस्पद वाटल्याने, विमानतळावर उतरताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. यात त्याच्याकडे कोकेनचा साठा सापडला. हे प्रतिबंधीत अमली पदार्थ ज्या व्यक्तीला दिले जाणार होते त्या महिलेला अटक करण्यातही संचालनालयाला यश आले आहे.

हे ही वाचा:

केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र चोरटयांनी पळवले !

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी राज्याराज्यात बनावट संस्था, विद्यार्थी

दिल्लीतील बलात्कारात पतीला पत्नीची साथ !

फक्त २५ किमी; चंद्राच्या सर्वांत जवळच्या कक्षेत पोहोचले लँडर विक्रम

 

अटक केलेली महिला ही युगांडाची नागरिक असून, नवी मुंबईत, वाशी इथे तिला अटक केल्याचे डीआरआयने कळवले आहे. हे अमली पदार्थ आणणाऱ्या आणि ते मागवणाऱ्या दोघांनाही अमली आणि मादक पदार्थ प्रतिबंध कायदा १९८५ मधील तरतुदींनुसार अटक केल्याचं डीआरआयने कळवलं आहे. पुढच्या कायदेशीर कारवाईसाठी या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा