26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामादिल्लीतील बलात्कारात पतीला पत्नीची साथ !

दिल्लीतील बलात्कारात पतीला पत्नीची साथ !

मुलीला आधार देण्यासाठी घरी आणले आणि केले शोषण

Google News Follow

Related

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दिल्लीतील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे आरोपी दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या उपसंचालक पदावर आहे.या प्रकरणात आरोपीची पत्नी देखील सहभागी असून आपल्या पती पासून मुलगी गर्भवती राहिल्याचे कळताच तिने पीडित मुलीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचे उघड झाले आहे.

२०२० मध्ये पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. आरोपी हा मुलीच्या वडिलांचा मित्र होता. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगी एकटी पडली होती.मित्राच्या मुलीचे सांत्वन करण्यासाठी आरोपीने तिला आपल्या घरी आणले.त्यानंतर आरोपीने मुलीचे वारंवार शोषण केले.जेव्हा पीडित महिलेला ती गर्भवती असल्याचे समजले तेव्हा तिने उपसंचालकांच्या पत्नीला सांगितले. मात्र, गुन्ह्याची तक्रार करण्याऐवजी पत्नीने तिला हे प्रकरण दाबून ठेवण्याचे सांगितले आणि गर्भपात करण्यासाठी तिच्या मुलाकडून औषधोपचार घेण्यास सांगितले.

हे ही वाचा:

लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; ९ जवानांचा मृत्यू !

रशियाच्या ‘लुना २५’ चांद्रयानात तांत्रिक अडथळा !

निवडणुकांची भीती नेमकी कोणाला?

छगन भुजबळ ब्राह्मणांवर घसरले!

त्यानंतर पीडित मुलीने उपसंचालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाच्या उपसंचालकाविरुद्ध (पॉक्सो) कायद्यांतर्गत रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.एफआयआरनुसार, डेप्युटी डायरेक्टरने २०२० ते २०२१ या कालावधीत १४ वर्षीय पीडितेवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे.या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या कारणावरून त्याच्या पत्नीवरही गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा