रशियाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रमोहिमेची अखेर दुर्दैवी अखेर झाली. लुना २५ हे यान चंद्रापर्यंत पोहोचले पण ते तिथे नीट लँड होऊ शकले नाही आणि चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. जवळपास ५० वर्षातील ही त्यांची पहिलीच चांद्रमोहिम होती ती अशारीतीने अपयशी ठरली. रशियाच्या रॉसकोमॉसने ही मोहीम अपयशी ठरल्याचे जाहीर केले.
शनिवारी हे यान चंद्रावर उतरण्यापूर्वी कक्षेत स्थिरावले होते. पण त्यात झालेल्या बिघाडामुळे ते चंद्राच्या पृष्ठभागावर नीट उतरू शकले नाही आणि कोसळले. या यानाशी असलेला संपर्कच तुटला.
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, १९ ऑगस्टला लुना २५ हे यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावणार होते. पण मॉस्कोच्या वेळेनुसार २ वाजून ५७ मिनिटांनी लुना २५ शी असलेला संपर्क तुटला. १९ आणि २० ऑगस्टला त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले पण त्यात यश आले नाही. यामागीला कारणे आता शोधून काढण्यात येतील.
रशियाच्या ‘लुना -२५’ या अंतराळ यानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. रशियाची अंतराळ संशोधन संस्था रोस्कोमॉस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधी कक्षा बदलताना तांत्रिक अडथळे आले. त्यामुळे ‘लुना-२५’ व्यवस्थितरीत्या कक्षा बदलू शकले नाही. अचानक आलेला हा तांत्रिक अडथळा दूर करण्यात अंतराळ संशोधन संस्थेचे तंत्रज्ञ सध्या तरी अपयशी ठरले आहेत. ते त्यावर सातत्याने काम करत आहेत. याआधी लुना हे २१ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असे रोस्कोमॉसने जाहीर केले होते.
हे ही वाचा:
बद्रीनाथ महामार्गावरील ७० मीटरचा रस्ता खचला
भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार
रजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो
रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’
‘लुना-२५’ने चंद्राच्या ‘ग्राऊंड क्रेटर’ची छायाचित्रे जाहीर केली आहे. हे चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील तिसरे सर्वांत खोल विवर आहे, ज्याचा व्यास १९० किमी आहे आणि त्याची खोली आठ किमी. आहे. ‘लुना-२५’वरून आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून चंद्राच्या मातीतील रासायनिक घटकांबद्दल अधिक माहिती मिळाली आहे.
भारताचे ‘चांद्रयान ३’ आणि रशियाचे ‘लुना २५’ याने चंद्राभोवतीच्या कक्षेत फिरत होते. ‘चांद्रयान ३’चे प्रक्षेपण १४ जुलै रोजी झाले. तर, ‘लुना २५’चे प्रक्षेपण ११ ऑगस्टला. ‘चांद्रयान ३’ला चंद्राच्या कक्षेत पोचण्यासाठी २२ दिवसांचा कालावधी लागला; तर ‘लुना २५’ केवळ पाच दिवसांत चंद्राच्या कक्षेत पोहोचले. ‘लुना २५’चे प्रक्षेपण सोयुझ २.१बी या रॉकेटच्या साह्याने करण्यात आले. या रॉकेटच्या साह्याने पृथ्वीनजीकच्या कक्षेत सर्वाधिक आठ हजार २०० किलो वजनाच्या उपग्रहाला प्रक्षेपित करता येते.
सुमारे ५० वर्षांतील रशियाची अशी पहिलीच मोहीम आहे.