25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषलडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; ९ जवानांचा मृत्यू !

लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; ९ जवानांचा मृत्यू !

कारू गॅरीसनहून सध्या लेहजवळील क्यारीच्या दिशेने जाताना अपघात

Google News Follow

Related

लडाखमधील कायरी भागात भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. लष्काराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या या अपघातात ९ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जवान जखमी असल्याचे वृत्त आहे. आलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त लष्कराच्या ट्रकमध्ये २ जेसीओ (Junior Commissioned Officer) आणि ७ जवान होते.

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लष्कराचा ट्रक अपघातग्रस्त झाला. क्यारी शहरापासून ७ किमी दूर अंतरांवर हा अपघात झाला आहे. या ट्रक मध्ये भारतीय जवान होते. एकूण ३४ कर्मचार्‍यांसह एक यूएसव्ही, ट्रक आणि अॅम्ब्युलन्ससह ३ वाहनांची ही रेकी करणारे पथक असल्याची प्राथमिक माहिती आहे. भारतीय जवान कारू गॅरीसनहून सध्या लेहजवळील क्यारीच्या दिशेने जात होते तेव्हा हा अपघात झाला.या अपघातामध्ये ९ जवानांचा मृत्यू झाला असून काही जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

निवडणुकांची भीती नेमकी कोणाला?

नितीन गडकरींनी फेटाळला कॅग अहवालाचा दावा

देवेंद्र फडणवीसांबद्दल खालच्या पातळीतील भाषा सहन करणार नाही

भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने मी दु:खी आहे. त्यांनी आमच्या देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी जवानांना फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा