28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषनितीन गडकरींनी फेटाळला कॅग अहवालाचा दावा

नितीन गडकरींनी फेटाळला कॅग अहवालाचा दावा

द्वारका एक्स्प्रेस-वेवर १२ टक्के पैसे वाचवल्याचा दावा

Google News Follow

Related

द्वारका एक्स्प्रेस-वे संदर्भातील कॅग (कम्प्र्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) अहवालात घोटाळा झाल्याची टिप्पणी करण्यात आलीय. गेल्या १० ऑगस्ट रोजी हा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला. यासंदर्भातील कॅग अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी फेटाळला आहे. तसेच एद्वारका एक्स्प्रेस-वेमध्ये १२ टक्के पैशांची बचत झाल्याचा दावा गडकरींनी केलाय.

 

 

कॅग अहवालावर चर्चा होत असतानाच सर्व आरोप फेटाळून लावत गडकरी म्हणाले की, या अहवालात सांगितलेले मुद्दे योग्य नाहीत. द्वारका एस्क्प्रेसवे २९ किलोमीटर अंतराचा असल्याचे सांगण्यात आलेय. आम्ही जो कॅबिनेट नोट पाठवली होती त्यात लिहिले होते की आम्ही ५ हजार किलोमीटरचा टू लेन रोड बनवू आणि त्याची किंमत ९१ हजार कोटी रुपये असेल. यात फ्लायओव्हर आणि रिंगरोडची किंमत एस्टिमेटेड डीपीआर बनल्यानंतर ठरवण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

 

हे ही वाचा:

बद्रीनाथ महामार्गावरील ७० मीटरचा रस्ता खचला

आशिया कप संघनिवडीसाठी रोहित शर्मा उपस्थित राहणार

रजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो

जनधन खात्यांनी गाठला ५० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा

मुद्दा असा आहे की कॅग ज्याला २९ किलोमीटर म्हणत आहे, तो २३० किलोमीटरचा एस्क्प्रेसवे आहे. यात ६ टनेल आणि ५६३ किलोमीटर एकूण लेनचा रोड आहे. जो टेंडर निघाला होता तो २०६ कोटी रुपये प्रति किलोमीटर साठी होता. त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टवर १२ टक्के कमी खर्च केल्याचे गडकरींनी सांगितले.

 

 

गडकरी म्हणाले की, आमच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्दा कॅगसमोर ठेवला होता. चर्चेमध्ये सीएजीच्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली होती. पण, आमच्याकडून चूक झाली की आम्ही ही गोष्ट त्यांना लिखित स्वरूपात दिली नाही. आम्ही टाईम बाऊंड आहोत, रिझल्ट ओरिएंटेड आहोत आणि भ्रष्टाचार मुक्त आहोत. या सरकारमध्ये मी ५० लाख कोटींचे कामे केली आहेत. एकाही कामामध्ये कोणताही कत्रांटदार किंवा अन्य कोणी म्हणत असेल की एक रुपयाही द्यावा लागला असेल तर सांगाल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा