दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याचा फोन येताच मोठी गडबड उडाली. ही घटना दिल्ली विमानतळावर घडली. विमानातील प्रवाशांना सुखरूप विमानातून उतरवल्यानंतर विमानाची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, संशयास्पद काहीही न आढळल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात बॉम्ब असल्याबाबतचा कॉल शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी जीएमआर कॉल सेंटरला आला होता.
दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विस्तरा विमानात बॉम्ब असल्याचा फोन जीएमआर कॉल सेंटरला आला. ही धमकी मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि घाईघाईत विमान पूर्णपणे रिकामे करण्यात आले. सामानासह सर्व प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले. बॉम्ब बद्दलची माहिती देण्यासाठी जीएमआर कॉल सेंटरला सकाळी फोन आला होता. फोम येताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.
हे ही वाचा:
बिपाशा बासूच्या मुलीला हनुमान चालीसाचे धडे!
मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित
भारतीय नौदलाची INS विंध्यगिरी सज्ज; राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरण
हिमाचलमधील भूस्खलनाला बेबंद बांधकामे कारणीभूत
दरम्यान, मिळालेल्या माहितीनंतर विमानाची पूर्ण झडती घेण्यात आली. मात्र, झडतीनंतर विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. कॉल सेंटरमध्ये यापूर्वीही अनेकदा असे बनावट कॉल आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात काहीही संशयास्पद आढळले नाही. विमानातील तपास पूर्ण झाला असून बॉम्ब असल्याचा आलेला फोन हा बनावट होता हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बॉम्ब बद्दलची खोटी माहिती दिल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.