28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरधर्म संस्कृतीबिपाशा बासूच्या मुलीला हनुमान चालीसाचे धडे!

बिपाशा बासूच्या मुलीला हनुमान चालीसाचे धडे!

बिपाशाने शेअर केला व्हिडीओ

Google News Follow

Related

बॉलिवूडचे स्टार कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे सध्या त्यांच्या मुलीमुळे चर्चेत असतात. बिपाशा आपल्या मुलीबद्दलचे अनेक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना शेअर करत असते. देवी असे बिपाशाने तिच्या मुलीचे नाव ठेवले असून मुलीला योग्य संस्कार देण्याचे कर्तव्य सध्या बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर पार पडत असल्याचे दिसून येत आहे.

निसर्गाचे सौंदर्य दाखवण्यापासून हिंदू धर्मातील कथा सांगण्यापर्यंत, बिपाशा आणि करण हे त्यांच्या मुलीला देवीला नेहमीच चांगल्या गोष्टी शिकवत असतात. नुकताच बिपाशाने देवीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये देवीचे वडिल करण सिंग ग्रोव्हर हे हनुमान चालीसा पाठ करताना दिसत आहे. बिपाशा बसूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण सिंग ग्रोव्हर झोपण्यापूर्वी आपल्या मुलीला हनुमान चालीसा ऐकवताना दिसत आहे.

देवी देखील शांतपणे हनुमान चालीसा ऐकताना खेळताना दिसत आहे. बिपाशा बासूने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘बेडटाइम विथ पापा, मामा आणि देवी’. सध्या देवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहते आणि कलाकार तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

 हे ही वाचा:

मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित

भारतीय नौदलाची INS विंध्यगिरी सज्ज; राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरण

हिमाचलमधील भूस्खलनाला बेबंद बांधकामे कारणीभूत

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भारतात नव्हे अफगाणिस्तानात; नऊ पत्रकारांना अटक

काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या मुलीवर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्टची सहा तासांची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला होता. देवीच्या जन्मानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले की त्यांच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्रे आहेत. त्यानंतर ती तिन महिन्याची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा