25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषनो आयडी नो एंट्री, दारूवर बंदी; जाधवपूर विद्यापीठाची नवीन नियमावली !

नो आयडी नो एंट्री, दारूवर बंदी; जाधवपूर विद्यापीठाची नवीन नियमावली !

विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाधवपूर विद्यापीठाचे नवीन नियम

Google News Follow

Related

वसतिगृहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसानंतर जाधवपूर विद्यापीठाने नवीन नियम जारी केले आहेत.कॉलेज कॅम्पसमध्ये प्रथम वर्षाच्या अंडरग्रेजुएट स्वप्नदीप कुंडू विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाधवपूर विद्यापीठाने नवीन नियमांची घोषणा करत
लवकरच हे नियम लागू होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

कला शाखेचा विद्यार्थी असलेला नादिया जिल्ह्यातील हंसखळी येथील स्वप्नदीप कुंडू ९ ऑगस्ट बुधवारी रोजी मध्यरात्री वसतिगृहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडला. त्याला उपचारासाठी केपीसी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले मात्र, गुरुवारी पहाटे साडेचार वाजता त्याचा मृत्यू झाला.त्यानंतर काही दिवसानंतर जाधवपूर विद्यापीठाकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.विद्यापीठाने म्हटले आहे की, ज्याला कॉलेजच्या परिसरात प्रवेश करायचा असेल त्याला जाधवपूर विद्यापीठाने जारी केलेला वैध ओळखपत्र सादर करावा लागेल.तसेच कॉलेज कॅम्पसमध्ये मद्यपानावरही बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा:

ताडदेव लूट तसेच वृद्धेच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीवर राहुल गांधी

भारताकडून काहीतरी शिका, पाकिस्तानला चीनचा सल्ला!

आज लोकसभा निवडणुका झाल्यास कोण मारणार बाजी?

जाधवपूर विद्यापीठाच्या आदेशात नमूद केलेले नियम
संध्याकाळी ८ ते सकाळी ७ या दरम्यान कॅम्पसमध्ये कोणालाही प्रवेश करायचा असेल तर जाधवपूर विद्यापीठाने जारी केलेले वैध ओळखपत्र दाखवावे लागेल.विद्यापीठाने जारी केलेले ओळखपत्र कोणाकडे नसेल तर त्या व्यक्तीने ओळखीचा वैध पुरावा दाखवणे बंधनकारक राहील, तसेच कॅम्पसमधील ज्या व्यक्तीला भेटायचे असेल तर त्याने त्याचा तपशील देखील द्यावा लागेल.आवारातील दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर विद्यापीठाने जारी केलेले JU स्टिकर्स असणे आवश्यक आहे.जाधवपूर विद्यापीठाच्या परिसरात अंमली पदार्थ आणि दारूच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.याशिवाय मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचेही महाविद्यालयाने जाहीर केले आहे.

जाधवपूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार स्नेहोमोंजू बसू म्हणाले की, कॅम्पसमध्ये प्रवेशकरणाऱ्या गेट वर, मुख्य वसतिगृह परिसराच्या दरवाज्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, वर्गखोल्या किंवा कॉरिडॉरमध्ये कोणतेही सीसीटीव्ही बसवले जाणार नाहीत.मात्र, कॅम्पसचा संपूर्ण परिसर आतापासून सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असेल.”दरम्यान, स्वप्नदीप कुंडू विद्यार्थ्याला रॅगिंग आणि त्रास दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी कोलकाता पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा