27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील चर्च आणि इमारतींची तोडफोड !

ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील चर्च आणि इमारतींची तोडफोड !

तोडफोड सुरु असताना पोलिसांची बघ्याची भूमिका, स्थानिक ख्रिश्चनांचा आरोप

Google News Follow

Related

पाकिस्तानातील फैसलाबादमधील जरनवाला जिल्ह्यातील एका ख्रिश्चन कुटुंबावर ईशनिंदा केल्याचा आरोप करत समाजकंटकांकडून आजूबाजूच्या काही ख्रिश्चन इमारतींसह अनेक चर्चची तोडफोड करण्यात आली आहे.चर्च आणि इमारतींची तोडफोड सुरु असताना पोलीस बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप स्थानिक ख्रिश्चनांनी केला आहे.

बुधवारी, फैसलाबादमधील जरनवाला जिल्ह्यात ही तोडफोडीची घटना घडली.सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या एका ख्रिश्चन व्यक्तीने कुराण विरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्या प्रकरणी स्थानिक मुस्लिम संतप्त झाले. जमावाने त्या ख्रिश्चन व्यक्तीचे घर तर फोडलेच पण भागातील चर्च आणि इतर ख्रिश्चन वस्त्यांचीही तोडफोड केली.या तोडफोडीचा सोशल मीडियावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला, यामध्ये जमाव चर्चच्या वर चढून ख्रिश्चनांसाठी आदराचे प्रतीक असणाऱ्या क्रॉसला काहीजण लाथ मारत खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

डॉनमधील वृत्तानुसार,पंजाबचे पोलिस प्रमुख उस्मान अन्वर यांनी सांगितले की, आंदोलकांशी आम्ही बोलणी करत आहोत तसेच जागोजागी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक ख्रिश्चनांनी तक्रार केली आहे की, जमाव आमची घरे, चर्च व इमारतींची तोडफोड करत असताना पोलीस फक्त मूक प्रेक्षक बनून बघ्याची भूमिका करत होते.

हे ही वाचा:

विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला मारहाण

चांद्रयानाचा चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी

पोलिसांनी आरोपी ख्रिश्चन व्यक्तीविरुद्ध पाकिस्तानच्या कलम २९५B (पवित्र कुराणाची विटंबना, इ.) आणि २९५C (पवित्र प्रेषितांच्या संदर्भात अपमानास्पद टिप्पणी इ.) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला असल्याचे डॉनने वृत्त दिले आहे.

X (पूर्वीचे ट्विटर) याबाबत चर्च ऑफ पाकिस्तानचे अध्यक्ष बिशप आझाद मार्शल म्हणाले की, आमच्या धर्माच्या बायबलची विटंबना करण्यात आली आहे आणि ख्रिश्चनांवर पवित्र कुराणाचे उल्लंघन केल्याचा खोटा आरोप करून त्यांना छळण्यात आले आहे.ते पुढे म्हणाले, “आमच्यावर ज्यांनी हल्ला केला होता त्यांच्याविरुद्ध आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार्‍यांकडून न्याय आणि कारवाईसाठी मागणी करत आहोत.नागरिकांच्या सुरक्षेची देखील मागणी त्यांनी केली आहे.नुकताच स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात आता , या मातृभूमीत त्यांचे जीवन किती मौल्यवान आहे याची खात्री देण्यास त्यांनी सांगितले आहे.

माजी सिनेटर अफ्रसियाब खट्टक म्हणाले, “हे निंदनीय आहे. इस्लाम सोडून इतर धर्माचे पालन करणाऱ्या लोकांच्या प्रार्थनास्थळांना सुरक्षा देण्यात पाकिस्तानी प्रशासन अपयशी ठरले आहे. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांना शिक्षा न मिळाल्याने अतिरेकी आणि दहशतवाद्यांना बळ मिळाले आहे. ज्या लोकांकडून “बायबलची विटंबना करण्यात आली आहे आणि ख्रिश्चनांवर पवित्र कुराणाचे उल्लंघन केल्याचा खोटा आरोप करून त्यांना छळण्यात आले आहे, त्या गुन्हेगारांना लवकरात-लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा