26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामाठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केले ५ जणांना जेरबंद

ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केले ५ जणांना जेरबंद

अटक करण्यात आलेल्या आरोपीवर तीन खुनाचे गुन्हे दाखल

Google News Follow

Related

ठाणे शहरातील गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोन गावठी पिस्तुल, दोन मॅगझीन, ३७ जिवंत काडतूस जप्त करत ५ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपीवर तीन खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

 

 

ठाणे शहरातील गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस शिपाई अरविंद शेजवळ यांना गुप्त बातमीदारामार्फत गुन्हेगारांची माहिती मिळाली. त्यानंतर खंडणी विरोधी पथकातील पोलीस शिपाई आणि अधिकारी यांनी डाॅ मुस चैक, तलावपाळी फुटपाथवर सापळा रचत गुन्हेगारांना अटक केली.पोलिसांच्या कारवाईत अटक करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मुन्ना राजबली दुबे (३५)याला पकडण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपी दुबेवर खुनाचे तीन गुन्हे दाखल आहेत.नवी मुंबईतील कोपरखैरणे मधील कोपरीगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत असून मूळचा बिहार राज्यातील जि.आरा, मारोतीनगर येथील रहिवाशी आहे.

 

 

त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पीस्टल, दोन मॅगझीन, ७ जिवंत काडतुस असा एकूण ६१,८५०/- रूपये किमतीचे अग्नीशस्त्रासह मुद्देमाल जप्त करण्यात आला.कोणत्यातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचा त्याचा हेतू असावा असे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी आरोपी विरूद्ध नौपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. २२८/२०२३ शस्त्र अधिनियम कलम ३, २५(१ब)(अ) सह महा.पो.का.कलम ३७(१)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घरातून ३०००/- रूपये किमतीचे एकूण ३० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत.आरोपी दुबे याने यापुर्वी पीस्टल व रांउड हे त्याचे ओळखीचे सराईत गुन्हेगारांना विक्री केल्याचे पोलिसांना तपासात सांगितले.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

काश्मीरमध्ये ‘हिजबुल’ दहशतवाद्याच्या भावानेच फडकवला तिरंगा

चांद्रयान- ३ चंद्राच्या जवळ पोहचले; १५० किमी x १७७ किमीच्या कक्षेत प्रदक्षिणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ध्वजारोहणाचा विक्रम

त्यानंतर पोलिसांनी नमूद गुन्हेगारांचा शोध घेवुन त्यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे.शोएब याकुब मन्सुरी (२९) करंजडे-रायगड, विजय हरिश्चंद्र पवार (३३) वांवजे गाव-रायगड, अमित वरदराज भट(३९) नवी मुंबई, राजेश बाळाराम कुरूंगळे (३२) रिसगाव-रायगड असे अटक केलेले आरोपी आहेत.वरील सर्व आरोपीतांकडून गुन्हयामध्ये एकूण दोन गावठी पिस्टल, दोन मॅगजीन, ३७ जिवंत काडतुसे असा एकूण ६४८५०/रूपये किमतीचे अग्निशस्त्रे, काडतुसे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींची दिनांक १४/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक, विजयकुमार राठोड हे करीत आहेत.

 

 

सदरची कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.मालोजी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनिरी/पोपट नाळे, पोउपनिरी/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडेे, सपोउनि/संजय बाबर, सपोउिन/कल्याण ढोकणे, पोहवा/जगन्नाथ सोनवणे, पोहवा/संदिप भोसले, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/आशिष ठाकुर, पोहवा/सुहास म्हात्रे, पोहवा/संजय राठोड, मपोहवा/शितल पावसकर, पोशि/अरविंद शेजवळ, पोशि/तानाजी पाटील, पोशि/देवेंद्र देवरे, मपोशि/मयुरी भोसले, चापोना/भगवान हिवरे, सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा