29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणकाही लोकं निवडणूक आली की मराठी माणूस मु़ंबई बाहेर गेल्याची आरोळी ठोकतात

काही लोकं निवडणूक आली की मराठी माणूस मु़ंबई बाहेर गेल्याची आरोळी ठोकतात

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

Google News Follow

Related

‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस विश्रांती घेण्यासाठी आपल्या गावी गेले होते. यावरून विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर खोचक टीका करत प्रत्युत्तर दिले.

घर हे सर्व सामान्यांचं स्वप्न असतं, सामान्य माणूसाला बळ देण्याचं काम म्हाडा करतेय. म्हाडावर लोकांचा विश्वास वाढला आहे. मंत्री सावेंप्रमाणे मलाही काही जणांनी घरासाठी विचारलं होतं. पण मी म्हटलं आता तसे काही चालत नाही. आता सर्व पारदर्शकता आहे. म्हाडाच्या या लॉटरीमुळे मुंबईबाहेर गेलेले मुंबईकर पून्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रसत्न असल्याचं शिंदे म्हणाले.

काही लोकं निवडणूक आली की मराठी माणूस मु़ंबई बाहेर गेल्याची आरोळी ठोकतात, राजकारण करतात. आम्ही ते करणार नाही. आमचा प्रयत्न प्रामाणिक, असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरे गटाला लागवला आहे. तसेच आम्ही टिकेला कामातून उत्तर देतो. राजकिय इच्छा शक्ती असली की चांगली कामे करता येतात, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

मोदींच्या आवाहनानंतर भाजप नेत्यांनी बदलला डीपी, पण गमावले गोल्डन टिक

महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

काश्मीरमध्ये ‘हिजबुल’ दहशतवाद्याच्या भावानेच फडकवला तिरंगा

चांद्रयान- ३ चंद्राच्या जवळ पोहचले; १५० किमी x १७७ किमीच्या कक्षेत प्रदक्षिणा

आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटपासूनच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिलं आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले. गिरणी कामगार, म्हाडा, वरळी बीडीडी चाळीतील लोकांसाठी महत्त्वाचे निर्णय या काळात घेण्यात आले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा