आधी ट्विटर आणि आता एक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपल्या खात्याचा डीपी बदलल्यामुळे अनेक भाजप नेत्यांना त्यांचे ‘गोल्डन टिक’ गमवावे लागले आहे. यामध्ये अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रवक्त्यांचाही समावेश आहे. भाजपनेत्यांनी त्यांचा डीपी ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानांतर्गत बदलला होता. ही मोहीम ७७व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. या मोहिमेंतर्गत मोदी यांनी सोशल मीडिया प्रोफाइलवर भारताच्या तिरंग्याचे छायाचित्र लावण्यासाठी प्रोत्साहित केले गेले होते. त्यानंतर अनेक भाजपनेत्यांनी त्यांचे प्रोफाइल छायाचित्र हटवून तिरंग्याचे चित्र लावले होते.
तिरंग्याचे चित्र लावल्यामुळे ज्यांनी ‘गोल्डन टिक’हे चिन्ह गमावले आहे, त्यात हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचा समावेश आहे. तसेच, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनाही ‘गोल्डन टिक’ गमवावे लागले आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या धोरणांनुसार, वास्तवातील नाव आणि डिस्प्ले फोटो (छायाचित्र) यांच्यासहच व्हेरिफाइड खाती चालवली जाऊ शकतात.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक
काश्मीरमध्ये ‘हिजबुल’ दहशतवाद्याच्या भावानेच फडकवला तिरंगा
चांद्रयान- ३ चंद्राच्या जवळ पोहचले; १५० किमी x १७७ किमीच्या कक्षेत प्रदक्षिणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ध्वजारोहणाचा विक्रम
आता नवीन नियमांनुसार, एक्सचे व्यवस्थापन या नेत्यांच्या प्रोफाइलचा पुन्हा आढावा घेईल. जर सर्व काही मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल, तर या नेत्यांना त्यांचे ‘गोल्डन टिक’ पुन्हा मिळेल. पंतप्रधान मोदी यांनीही त्यांचा डीपी बदलून तिरंग्याचे छायाचित्र लावले आहे. मात्र त्यांचे ‘ग्रे टिक’ हटवण्यात आलेले नाही. ‘गोल्डन टिक’ ही एक व्हेरिफिकेशनची खूण आहे. ज्यामुळे हे खाते खरे असून खऱ्या व्यक्तीशी किंवा संघटनेशी संबंधित आहे, हे दर्शवले जाते.