30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेष'जेलर' चित्रपटाने पार केला २५० कोटींचा गल्ला!

‘जेलर’ चित्रपटाने पार केला २५० कोटींचा गल्ला!

गेल्या चार दिवसांत केला विक्रम

Google News Follow

Related

सुपरस्टार रजनीकांतचा ‘जेलर’ हा चित्रपट अक्षय कुमार आणि सनी देओलच्या चित्रपटांच्या एक दिवस आधी प्रदर्शित झाला होता, पण कमाईच्या बाबतीत त्याने सनी देओलच्या ‘गदर-२’ आणि अक्षयच्या ‘ओएमजी-२’ ला मागे टाकले आहे.अवघ्या चार दिवसात २५० कोटींचा टप्पा पार करत बॉलिवूडला मागे टाकले आहे.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर हा सिनेमा १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला.सिनेमा रिलीज झाल्यापासूनच चाहत्यांनी थिएटरबाहेर घुमाकुळ घातला.नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित जेलर चित्रपटाने अवघ्या ४ दिवसात २५० कोटींचा टप्पा पार केला आहे.रजनीकांतच्या जेलर चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये आहे, त्यानंतर आता या चित्रपटाने त्याची किंमत काढून नफा कमावण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

श्रीनगरमध्ये शालेय विद्यार्थी तिरंगामय !

पीएफआय षडयंत्र प्रकरणी एनआयएकडून ५ राज्यांत १४ ठिकाणी छापे!

बिबट्याची कातडी घेऊन पळणाऱ्याला श्रीनगरमध्ये केले जेरबंद

भारत-चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक!

पहिल्या तीन दिवसात जेलर चित्रपटाने १०८ कोटी ४० लाखांची कमाई केली होती.या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४८.३५ कोटी, दुसऱ्या दिवशी २५.७५ ,तिसऱ्या दिवशी ३४.३, चोथ्या दिवशी ३५.०० कोटीची कामे केली असून कमाईची घोडदौड सुरूच आहे.रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाने बॉलीवूडला चांगलीच टक्कर दिली आहे.बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘ओएमजी-२’ तसेच सनी देओलच्या ‘गदर-२’ सिनेमाला कमाईत मागे टाकले आहे.या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त शिव राजकुमार, मिर्ना मेनन, तमन्ना भाटिया ,मोहनला आणि वसंत रवी महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच दोन मराठी कलाकारांनीही या सिनेमात काम केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा