१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील आपला डीपी बदलला असून तिथे आता तिरंग्याचे छायाचित्र लावण्यात आले आहे. पंतप्रधानांनी असा डीपी लावण्याचे आवाहनही भारतवासियांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर (जे आधी ट्विटर म्हणून ओळखले जात होते) आवाहन केले की, सगळ्यांनी आपापल्या डीपीवर तिरंग्याचे छायाचित्र लावावे आणि हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी व्हावे.
आझादी का अमृतमहोत्सव या अंतर्गत पंतप्रधानांनी हर घर तिरंगा या मोहिमेची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत भारताच्या ७६व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लोकांनी घरी तिरंगा आणावा आणि घरी तो लावून स्वातंत्र्यदिन साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे ही वाचा:
भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर चौथ्यांदा कोरले नाव
आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी
राज्यातील ‘आयटीआय’मध्ये व्हर्चुअल क्लासरूम सुरू होणार
दहशतवादी नाचण कुटुंबियांचे राजकीय कनेक्शन तगडे
गेल्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या मोहिमेला प्रारंभ झाला होता. आता आझादी का अमृतमहोत्सवची यंदा सांगता होत आहे. त्यावेळीही ही घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. देशाच्या उभारणीत सर्व नागरिकांचा हातभार आहे, हे लक्षात ठेवून लोकांनी आपापल्या घरी तिरंगा लावत एकजूट दाखवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी सांस्कृतिक मंत्रालयाने पोस्ट ऑफिसमध्ये २.५ कोटी तिरंगे वितरित करण्यात आल्याचे सांगितले. मंत्रालयाने असेही जाहीर केले की, १३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रभात फेऱ्या, तिरंगा यात्रा काढून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला गेला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालयांमध्येही या कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या मेरी माटी मेरा देश या मोहिमेचीही घोषणा करण्यात आलेली आहे. त्यातही मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत.