फ्रान्सचे राजधानीचे शहर असलेल्या पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर या इमारतीमधून सर्वांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. तसेच बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून सर्च ऑपरेशन देखील करण्यात आले.
बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने आयफेल टॉवर शनिवारी काही काळासाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर शनिवारी आयफेल टॉवरमधील तीन मजल्यांवरील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आलं. यासोबतच पोलिसांनी मिळून घटनास्थळी शोध मोहीम राबवली. बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी सर्व मजल्यांवर शोध घेतला. यावेळी पोलिसांनी संशयास्पद दिसणाऱ्या पर्यटकांचीही चौकशी केली. मात्र, काहीच संशयास्पद न आढळल्याने दोन तासांनी आयफेल टॉवर पुन्हा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला.
हे ही वाचा:
‘मणिपूर हिंसाचारावर लष्कर हा तोडगा नाही’
त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!
विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी रॅगिंग करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला अटक
बलुचिस्तानमधील नेता घेणार पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ
पॅरिसमधील आयफेल टॉवर जगभरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. यामुळे येथे जगभरातील पर्यटक भेट देत असतात. दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक आयफेल टॉवर पाहण्यासाठी येत असतात. जगातील सात आश्चर्यांमधील एक आयफेल टॉवर जगभरात प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ६२ लाख पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.