वंदे भारत एक्स्प्रेस ही ट्रेन आता सिगारेटमुळे चर्चेत आली आहे. सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तिरुपतीहून सिकंदराबादला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
वंदे भारत ट्रेन ही आंध्र प्रदेशातील तिरुपतीहून सिकंदराबादला जात होती. ट्रेनने गुडूर स्थानक ओलांडलं त्यानंतर ट्रेनचे शेवटचे ठिकाण सुमारे आठ तासांच्या अंतरावर होते. दरम्यान, एक प्रवासी सिगारेट ओढायला म्हणून तो ट्रेनमधील टॉयलेटमध्ये गेला. काही वेळातच टॉयलेटमध्ये सिगारेटचा धूर पसरताच ट्रेनमधील फायर अलार्म वाजू लागला. त्यानंतर स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा सुरू झाली आणि संपूर्ण डब्यात एरोसोल फवारणीला सुरुवात झाली.
फायर अलार्म वाजल्याने प्रवाशांमध्ये घबराट उडाली होती. जीव वाचवण्यासाठी प्रवासी इकडे तिकडे धावू लागले होते. सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला ट्रेनमध्ये फायर अलार्म असल्याचं माहित नव्हतं. त्यात ही व्यक्ती विनातिकीट ट्रेनमध्ये प्रवास करत होती, त्यामुळे तो टॉयलेटमध्ये लपून बसल्याचंही बोललं जात आहे.
వందే భారత్ రైలులో పొగలు
గూడూరు – మనుబోలు మధ్య రైలు నిలిపివేత. తిరుపతి నుంచి హైదరాబాద్ వెళుతుండగా ఘటన.
రైలు టాయిలెట్లో ఓ వ్యక్తి సిగరెట్ తాగడంతో రైలు నిండా పొగలు.#VandeBharat #VandeBharatExpress pic.twitter.com/Vl2tW65oph
— Telugu Scribe (@TeluguScribe) August 9, 2023
हे ही वाचा:
कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू
मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेखीसाठी समिती
‘भारताला आपल्या नेत्यावर विश्वास आहे’
एअर इंडियाचा नवीन लोगो, नवीन रंगसंगती
रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्यानंतर रेल्वे पुढे रवाना करण्यात आली. या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ट्रेनमध्ये निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.