27 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरक्राईमनामाबीडमध्ये सिगारेटचे पाकीट महाग दिल्याने हॉटेलवर गोळीबार !

बीडमध्ये सिगारेटचे पाकीट महाग दिल्याने हॉटेलवर गोळीबार !

मध्यरात्री अंबाजोगाई रोडवरील हॉटेलवर तीन राउंड फायर

Google News Follow

Related

बीड जिल्यातील परळीत रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली.रात्रीच्या वेळी चहाच्या हॉटेलवर सिगारेटची मागणी केल्यास दुकानदाराने सिगारेटचे पाकीट जास्त दर लावून दिले. ग्राहकाने सिगारेटचे पाकीट महाग का दिले असा जाब विचारात दुकान मालक-नोकरांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर वादावाद झाल्याने एका ग्राहकाने थेट बंदुक काढून हवेत गोळीबार केला. ऐनवेळी नोकरांनी दुकानाचं शटर लावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गोळीबाराची घटना परळी शहराजवळच्या कण्हेरवाडी शिवारात घडली. काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीतून आंबेजोगाईकडून परळीकडे जात असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला आहे.कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे. हे हॉटेल विलास आघाव मागील एक वर्षांपासून चालवत आहेत.घडले असे की या हॉटेल ठिकाणी चारजण रात्री एक वाजण्याच्या सुमारास सिगारेट पिण्यासाठी आले होते.त्यांनी हॉटेलमधील नोकरांकडे सिगारेटचं पाकीट मागितलं.रात्रीच्या वेळी बहुतेक ठिकाणी खाण्या पिण्याच्या वस्तूवर हॉटेल्स जास्त दर लावून विक्री करत असतात.

हे ही वाचा:

दिवाळखोरीकडे चाललेला पाकिस्तान व्हॉट्सऍपला देणार टक्कर

भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठरविणाऱ्या इक्वेडॉर अध्यक्षपदाच्या उमेदवाराची गोळी झाडून हत्या

इस्रोचे लक्ष चंद्राच्या कक्षेतील ‘ट्रॅफिक’कडे

सर्वसामान्यांना दिलासा; रेपो रेट जैसे थे स्थितीत

त्याचप्रमाणे हॉटेल्स मधील नोकरांनी ग्राहकाला सिगारेट दिले आणि त्याचे पैसे मागितले.मात्र , हे सिगारेटचे पाकीट महाग का दिले ? असा जाब विचारत ग्राहकाने वाद घालण्यास सुरुवात केली.त्यानंतर प्रकरण एवढं वाढलं की, बाचाबाची आणि वादावादी सुरू झाली. त्यानंतर प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं.राग अनावर झाल्याने आलेल्या ग्राहकांपैकी एका ग्राहकाने स्वतःकडील पिस्तूल काढलं आणि हवेत एक राउंड फायर केला. गोळीबाराचा आवाज ऐकून नोकरांनी भयभीत होऊन हॉटेलचे शटर लावून घेतले.यावरही अज्ञातखोर थांबले नाहीत हॉटेलच्या शटरवर दोन राउंड फायर करत तेथून पळ काढला.

या प्रकरणी हॉटेलचे मालक विलास आघाव यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,या प्रकरणी हॉटेल चालकानं गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन पाहाणी करत घटनेवेळी उपस्थित असलेल्या सर्व नोकरांचीही चौकशी केली.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके नियुक्त केले आहेत.मात्र, गोळीबाराच्या घटनेनं परळी हादरली असून आसपासच्या परीसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा