26 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरक्राईमनामाजो बायडन यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एफबीआयच्या छाप्यात ठार

जो बायडन यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एफबीआयच्या छाप्यात ठार

७६ वर्षीय व्यक्तीने जो बायडन यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती

Google News Follow

Related

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे सध्या पश्चिम अमेरिकेचा दौरा करत आहेत. दरम्यान, जो बायदान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, बायदान यांना मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन म्हणजेच एफबीआयने यमसदनी पाठवलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष बायडेन हे त्या राज्यात जाण्यापूर्वीच आरोपीला ठार आले आहे.

 

राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पश्चिम अमिरेकेचा दौरा करत आहेत. ते बुधवारी न्यू मॅक्सिको येथे गेले होते, त्यानंतर त्यांचे यूटा येथे जाण्याचे नियोजन होते. क्रेग रॉबर्टसन नावाच्या ७६ वर्षीय व्यक्तीने जो बायडन यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. रॉबर्टसनने एक पोस्ट करुन म्हटलं होतं की, बायटन यूटा येथे येत असल्याचं ऐकलं आहे. इकडे मी एम २४ स्नायपर रायफलवरील धुळ साफ करत आहे. त्यांनी इथे यावेच. रॉबर्टसन यांच्या या पोस्टमुळे एफबीआय सतर्क झाली होती.

 

खबरदारीचा उपाय म्हणून एफबीआयने रॉबर्टसन याच्या घरी छापा टाकण्याचे ठरवले. त्यानंतर रॉबर्टसन ठार झाल्याचं जाहीर करण्यात आलं. फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन संस्थेकडून सांगण्यात आलं की, स्पेशल एजेंट वॉरंट घेऊन सॉल्ट लेक सिटीच्या दक्षिणेमध्ये असलेल्या प्रोवोमध्ये क्रेग डिवीयू रॉबर्टसन याच्या घरी पोहोचले होते. यादरम्यान, सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी गोळीबार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार क्रेह डिवीयू रॉबर्टसन याच्याकडे शस्त्रास्त्रे होती. गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समर्थक होता आणि स्वत:ला “मागा ट्रम्पर” म्हणत होता, अशीही माहिती समोर आली आहे.

 

हे ही वाचा:

विषारी मशरूममुळे सासू-सासरे बळी; पण जेवण बनवणारी सून जिवंत

दिवाळखोरीकडे चाललेला पाकिस्तान व्हॉट्सऍपला देणार टक्कर

भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठरविणाऱ्या इक्वेडॉर अध्यक्षपदाच्या उमेदवाराची गोळी झाडून हत्या

इस्रोचे लक्ष चंद्राच्या कक्षेतील ‘ट्रॅफिक’कडे

तक्रारीनुसार, रॉबर्टसनवर तीन गुन्हे, आंतरराज्यीय धमक्या, राष्ट्रपतींविरुद्ध धमक्या आणि धमकी देऊन फेडरल कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रभाव पाडणे, अडथळा आणणे आणि बदला घेणे असे आरोप ठेवण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा