25 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरअर्थजगतसर्वसामान्यांना दिलासा; रेपो रेट जैसे थे स्थितीत

सर्वसामान्यांना दिलासा; रेपो रेट जैसे थे स्थितीत

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची माहिती

Google News Follow

Related

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक पार पडली. ८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या सहा सदस्यीय एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. यानंतर सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळीही पॉलिसी रेट म्हणजेच, रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे. सध्या रेपो रेट हा ६.५ टक्केच असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता काहीशी दूर झाली आहे.

बँकेने या वर्षी फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही म्हणजेच हा दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या बैठकीतही त्यांच्यात कोणताही बदल दिसून आला नाही. आरबीआयने गेल्या वर्षी मे महिन्यात व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

फेब्रुवारीपासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर आहे. यानंतर, एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या दोन एमपीसीच्या बैठकीत बेंचमार्क दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही, यावेळी देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह १५जणांविरुद्ध अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल

केरळचे नाव बदलणार? विधानसभेने एकमताने मंजूर केला ठराव

पाकिस्तानची संसद बरखास्त; पंतप्रधान शहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळही संपुष्टात

‘माझी माती माझा देश’मधून स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता

रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा करण्याबरोबरच, आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दावा केला की, भारत योग्य मार्गावर जात आहे आणि आगामी काळात देश जगातील विकासाचे इंजिन देखील बनेल. सध्या भारत जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत सतत वाढ होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा फायदा घेण्यासाठी भारत सध्या सर्वोत्तम स्थितीत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा