26 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरविशेषरजनीकांतचा ‘जेलर’ पाहण्यासाठी जपानी जोडपे पोहोचले चेन्नईला

रजनीकांतचा ‘जेलर’ पाहण्यासाठी जपानी जोडपे पोहोचले चेन्नईला

१० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे

Google News Follow

Related

तमिळ सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांच्या प्रेमाला सीमा नसल्याचे याआधी अनेकदा उघड झाले आहे. रजनीकांतचा नवीन चित्रपट रीलिज होत असताना त्यांचे चाहते फटाके वाजवण्यापासून ते चित्रपटाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यापर्यंत वाटेल ते करतात. मात्र रजनीकांतच्या चाहत्यांनीही ‘सीमा’ ओलांडली असल्याचे आढळून आले आहे. रजनीकांतचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘जेलर’ पाहण्यासाठी जपानमधील एक जोडपे चेन्नईला आले आहे. हे जोडपे चित्रपट पाहण्यासाठी आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रजनीकांतचा चित्रपट गुरुवार, १० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. रजनीकांतच्या चित्रपटाचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. फटाके फोडले जात आहेत आणि सुपरस्टारच्या पोस्टरवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षावही केला जात आहे. हा चित्रपट पाहताना तेथील रजनीकांतच्या चाहत्यांना जपानी जोडपेही रजनीकांतचा ‘जेलर’ चित्रपट पाहण्यासाठी आल्याचे समजताच या चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. हे जोडपे जपामनधील ओसाका शहरातून आले आहेत.   एका वृत्तसंस्थेने ट्विटरवर त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत जे जपानी जोडपे रजनीकांत यांचा चित्रपट थिएटरमध्ये पाहात आहेत. तेव्हा त्यांचा उत्साह या व्हिडीओत दिसत आहे. यासुदा हिदेतोशी हे रजनीकांतच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहेत. त्याने तमिळ भाषेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांचा चित्रपट पाहतानाचा आनंद व्यक्त केला. ‘जेलर चित्रपट पाहण्यासाठी आम्ही जपानहून चेन्नईला आलो आहोत,’ असे जपानमधील रजनीकांत फॅन क्लबचे प्रमुख यासुदा हिदेतोशी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

इम्रान खान यांना तुरुंगात माश्या, किड्यांचा त्रास

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह १५जणांविरुद्ध अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल

लोकसभेतून पळाला काँग्रेसचा बहादूरशहा जफर

वनडे वर्ल्डकपच्या ८ सामन्यांचे वेळापत्रक बदलले

रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट हा नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमार यांच्याही छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना, विनायकन आणि इतर अनेक कलाकार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा