26 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषभारतात निर्मित होणाऱ्या कफ सिरपला; WHO कडून धोक्याचा इशारा !

भारतात निर्मित होणाऱ्या कफ सिरपला; WHO कडून धोक्याचा इशारा !

भारतातील 'कोल्ड आऊट' या सिरपवर इराकनेही बंदी घातली आहे

Google News Follow

Related

बदलत्या वातावरणानुसार खोकल्याच्या उपचारासाठी भारतात निर्मित होणारे अनेक प्रकारचे सिरप उपलब्ध आहेत.यातीलच एका भारतीय कफ सिरप जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.कोल्ड आऊट (Cold Out) नावाचं हे कफ सिरप असून हे सिरप कमी दर्जाचं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.या सिरपवर इराकमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

 

 

कोल्ड आऊट हे सिरप सामान्य सर्दी, खोकला आणि ऍलर्जीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. पॅरासिटामॉल आणि क्लोरफेनिरामाइनच्या मिश्रणातून सिरप बनवले जाते.मात्र, हे सिरप सुरक्षितता आणि गुणवत्तेबाबत WHO ने ठरवलेल्या मानकांपासून वेगळं असल्याचे म्हटले आहे.कोल्ड आऊट (Cold Out) सिरप फोर्ट्स इंडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडसाठी Dabilife Pharma Pvt Ltd ने तयार केलं असून यावर नुकतेच इराकमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

 

 

हे ही वाचा:

‘भारतमातेची हत्या झाल्याच्या राहुल गांधी यांच्या उल्लेखावर काँग्रेसने टाळ्या वाजवल्या!’

विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षिकेनेच घातला गणवेशात

चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा

राहुल गांधींच्या कथित ‘फ्लाइंग किस’विरोधात तक्रार

डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे की, या कफ सिरपमध्ये एथिविन ग्लायकोल आणि डायथिलीन ग्लायकोल या दोन्ही घटकांची मात्रा ठराविक मर्यादेपेक्षा ०.१० टक्के अधिक आहे. या औषधाचा वापर केल्याने लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊन मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे हे सिरप धोकादायक असल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा