रश्मी शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले असताना, हा अहवाल कोणी फोडला? या अहवालात काहीच दम नाही अशा तऱ्हेची वक्तव्ये सरकारकडून केली जात आहेत. यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टिका केली जात आहे.
भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील सरकारवर टिका केली आहे. त्यांनी ट्वीट करताना असे म्हटले की, IPS रश्मी शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली आहे. खंडणीखोरीचे बिंग फुटले आहे. अहवालात काहीच नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर त्यांनी अहवाल जनतेसमोर ठेवावा. अहवाल गुलदस्त्यात ठेवून दूध का दूध और पानी का पानी….कसे होईल?
IPS रश्मी शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली आहे. खंडणीखोरीचे बिंग फुटले आहे. अहवालात काहीच नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर त्यांनी अहवाल जनतेसमोर ठेवावा. अहवाल गुलदस्त्यात ठेवून दूध का दूध और पानी का पानी….कसे होईल? pic.twitter.com/AWxiy5LUJt
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 27, 2021
हे ही वाचा:
ड्रीम मॉल आगीच्या प्रकरणात गुन्हा दाखल
कोविडपासून लसीची सुरक्षा लहानग्यांनाही मिळणार?
क्रिकेटच्या देवालाही कोरोनाची लागण
यावेळेला भातखळकरांनी एक व्हिडिओ देखील प्रसृत केला आहे. ज्यात त्यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात की, रश्मी शुक्लांचा टॉप सिक्रेट रिपोर्ट मी नाही देवेंद्र फडणवीसांनीच फोडला असे नवाब मलिक आता घाबरून सांगत आहेत. मलिक साहेब, रिपोर्ट फोडला तर फोडला म्हणा, घाबरता कशाला? आम्ही तर तेव्हाच सांगितलं, आमच्यावर कारवाई करा आम्ही फोडला म्हणून…. तुम्ही का घाबरताय?
त्याबरोबरच या व्हिडिओमध्ये भातखळकरांनी या रिपोर्टमध्ये दम नाही, तर रिपोर्ट प्रसिद्ध करा आणि त्या रिपोर्टप्रमाणे कारवाई करा. पण स्वतःच्या खंडण्या आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवायचा म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये नवाब मलिक आणि राष्ट्रवादी करत आहे. तुमच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे, हेच तुमच्या या घाबरट वक्तव्यातून सिद्ध होत आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.