28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाखोट्या बातम्या पसरवणाऱ्या आठ युट्युब चॅनल्सवर बंदी

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आठ युट्युब चॅनल्सवर बंदी

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची धडक कारवाई

Google News Follow

Related

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय ऍक्शन मोडमध्ये आले असून खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल काही युट्युब चॅनल्सवर कारवाई करण्यात आली आहे. मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आठ चॅनल्सवर कारवाई करत त्यांच्यावर बंदी आणली आहे. हे चॅनेल्स कोणत्याही तथ्याशिवाय लोकसभा निवडणुका वेळेपूर्वी जाहीर करण्याचे आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

देखो (Dekho), कॅपिटल टीव्ही (Capital TV), केपीएस न्यूज (KPS News), गव्हर्नमेंट व्लॉग (Government Vlog), अर्न टेक इंडिया (Earn Tech India), एसपीएन ९ न्यूज (SPN9 News), एज्युकेशनल दोस्त (Educational Dost) आणि वर्ल्ड बेस्ट न्यूज (World Best News) या यूट्यूब चॅनेल्सवर असलेल्या व्हिडीओजची पडताळणी करण्यात आली ज्यामध्ये हे चॅनल्स खोट्या बातम्या पसरवत असल्याचे आढळून आले. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या चॅनल्सची सत्यता तपासल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड बेस्ट न्यूज या यूट्यूब चॅनेलचे १७ लाखांहून अधिक सदस्य आहेत आणि १८ कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. हे चॅनेल भारतीय सैन्याचे चुकीचे वर्णन करत असल्याचे आढळले. तर, एज्युकेशनल दोस्त या चॅनेलचे ३० लाखांहून अधिक सदस्य आहेत आणि २३ कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. हे चॅनल सरकारी योजनांबद्दल चुकीची माहिती पसरवत होते, तर ४० लाखांहून अधिक सदस्य आणि १८९ कोटी व्ह्यूज असलेले एसपीएन ९ न्यूज हे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित खोट्या बातम्या पसरवत होते.

हे ही वाचा:

युती ठाकरेंनी तोडली, भाजपाने नाही

अविश्वास ठरावासाठी बीजेडीचा मोदी यांना पाठिंबा का?

चीनच्या पे-रोलवर पोसलेले पत्रकार किती?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२ रेल्वे स्थानके चमकणार

सरकारी व्लॉग या चॅनलला ४५ लाखांहून अधिक व्ह्यूज असून ते चॅनल सरकारी योजनांबद्दल खोट्या बातम्या पसरवत असल्याचे आढळून आले. तर, १० लाखांहून अधिक सदस्य आणि १३ कोटींहून अधिक व्ह्यूज असलेले केपीएस न्यूज चॅनल सरकारशी संबंधित योजना, आदेश आणि निर्णयांची माहिती देते जसे की एलपीजी सिलिंडर २० रुपयांना आणि पेट्रोलची उपलब्धता १५ रुपये प्रति लीटर अशा आशयाच्या खोट्या बातम्या पसरवत होते. इतरही चॅनल्स अशाच खोट्या बातम्या आणि माहिती देत असल्याचे लक्षात आल्यानंतर या चॅनल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा