भारतात काही वर्तमान पत्र, चॅनल, वेबसाईट कायम केंद्र सरकारच्या विरोधात असतात? सरकारची एखादी चांगली बाजू त्यांना का दिसत नाही? वेळ प्रसंगी ही माध्यमं केंद्र सरकारच्या विरोधात चीनची तळी उचलण्यासाठी का तत्पर असतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न्यूज क्लीक या वेबसाईटबाबत जो भांडाफोड झालाय त्यातून मिळालेली आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानंतर काँग्रेस, त्यांचे बलगबच्चे, डावे पक्ष आणि विकले गेलेले पत्रकार यांचे साटेलोटे उघड होते आहे.