चीनकडून भारतात राष्ट्रविरोधी कारवायांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा संशय यापूर्वीही व्यक्त केला गेला आहे. पण आता न्यूयॉर्क टाइम्सने यासंदर्भात खळबळजनक माहिती समोर आणली असून बातम्यांची वेबसाईट न्यूजक्लिकच्या माध्यमातून चीनी प्रचार केला जात असल्याचे या बातमीत म्हटले आहे. त्यामुळे चिनी प्रचारयंत्रणा भारताविरोधात कार्यरत असल्याची जी भीती सातत्याने भारताकडून व्यक्त केली जात होती, त्याला पुष्टी मिळाली आहे.
या सगळ्या प्रकरणात तंत्रज्ञानातील आघाडीचा उद्योगपती नेविल रॉय सिंघम याचे नाव समोर आले आहे. २०२१मध्ये इडीने केलेल्या तपासात न्यूज क्लिक या वेबसाईटला परदेशातून ३८ कोटींचा निधी मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचा तपास केल्यावर त्याची साखळी ही सिंघमशी जोडली गेल्याचे स्पष्ट झाले. भाजपाने त्यावर प्रतिक्रिया दिली होती की, भारतविरोधी घटक काम करत असून भारताची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याच्या कारवायाही सुरू आहेत.
यासंदर्भात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनचा कसा भारतविरोधी प्रचार सुरू आहे आणि त्याच्याशी काँग्रेसचा संबंध आहे हे आम्ही यापूर्वीही सांगत होतो असे सांगितले. मोहोब्बत की दुकान, चायना का सामान अशीच या सगळ्या नेटवर्कची कार्यपद्धती होती, असा घणाघात ठाकूर यांनी केला. पण आता या नव्या तपासातून न्यूज क्लिकबद्दल संशय खरा आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, चीनचा बचाव करण्यासाठी आणि त्यांची प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी पुरविला गेला आहे. सिंघमच्या माध्यमातून हा निधी उपयोगात आणला गेला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या संशोधनातून ही गोष्ट स्पष्ट झाली की, सिंघमच्या नेटवर्कच्या सहाय्याने चीनला फायदेशीर होईल, असे यूट्युब व्हीडिओ तयार केले गेले.
ईडीने ९ फेब्रुवारी २०२१मध्ये पीपीके न्यूजक्लिकवर छापेमारी केली होती. त्यातून मनीलॉन्डरिंगची माहिती त्यांना मिळाली होती. ही छापेमारी ५ दिवस चालली. या नेटवर्कच्या १० जागांवर ही छापेमारी सुरू होती. या कंपनीचा प्रमोटर प्रबीर पुरकायस्थच्या घरावरही इडीची धाड पडली. इडीला त्यात ३८ कोटींचे व्यवहार झाल्याचे लक्षात आले. त्यात एप्रिल २०१८मध्ये ९.५९ कोटी रुपये या कंपनीला मिळाले होते तर २८.२९ कोटी मिळाले.
पीपीएल न्यूजक्लिक ही कंपनी ११ जानेवारी २०१८मध्ये स्थापन झाली. त्यानंतर एप्रिल २०१८मध्ये एलएलसी डेलावेरने पीपीके न्यूजक्लिकमध्ये ९.५९ कोटी रुपये गुंतवले. २०१८ आणि २०२१च्या दरम्यान न्यूजक्लिकला २८.२९ कोटी रुपये मिळाले. त्यात जस्टिस अँड एज्युकेशन फंड, यूएसएकडून २७.५१ कोटी, जीएसपीएएन एलएलसी, अमेरिका कडून २६९८ लाख, ट्रायकॉन्टिनेन्टल, अमेरिका कडून ४९.३१ लाख, सेंट्रो पॉप्युलर देमिडासकडून २.३ लाख रुपये मिळाले. या निधीपैकी पीआरके न्यूजक्लिकने गौतम नवलखाला २०.५३ लाख हस्तांतरित केले. भीमा कोरेगाव प्रकरणातील एल्गार परिषदेशी या नवलखाचा संबंध होता. बाप्पादित्य सिन्हाला ५२.९ लाख देण्यात आले. इडीने सिंघम आणि पुरकायस्थ यांच्यातील इमेल व्यवहार तपासले तेव्हा न्यूजक्लिकला हे पैसे देण्यात आले ते चिनी प्रचारतंत्र राबविण्यासाठी.
हे ही वाचा:
न्यायालयाने हरियाणातील बुलडोझर कारवाई थांबवली
पुण्यातल्या दहशतवाद्यांच्या कारमध्ये सापडली होती जिवंत काडतुसं
सरकार जिंकले; दिल्ली सेवा विधेयक १३१ वि. १०२ मतांनी संमत
‘आम्ही आमच्या दाव्याच्या समीप’
अनुराग ठाकूर यांच्याकडून टीका
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात सांगितले की, आम्ही न्यूजक्लिकबाबत याआधीपासूनच सांगत होतो. काँग्रेस, चीन, न्यूजक्लिक यांचा या कारस्थानात कसा सहभाग आहे हे आमच्याकडून सांगितले जात होते. भारताला तोडण्यासाठीचा हा कट होता. मोहब्बत की दुकानमध्ये चायना का सामान अशी स्थिती आहे. रॉय सिंघमने न्यूज क्लिकला निधी पुरवला होता. त्याला चीनने हा पैसा दिला. आता न्यूयॉर्क टाइम्सने ही बातमी बाहेर काढली आहे, ज्याची तारीफ काँग्रेसकडून सातत्याने केली जात होती. हा निधी चीनकडून येतो पण त्याचे विक्रेते भारतीय आहेत. फेक न्यूजच्या नावाखाली हे चालले आहे. पत्रकार अभिसार शर्मावर निशाणा न्यूजक्लिकचा माजी पत्रकार अभिसार शर्मावर यानिमित्ताने सोशल मीडियात निशाणा साधला गेला. सध्या यूट्युबर असलेल्या अभिसार शर्माने यापूर्वी न्यूजक्लिकमध्ये काम केलेले आहे. अंकुर सिंग याने ट्विटरवर लिहिले की, ज्या न्यूजक्लिकमध्ये अभिसार शर्मा काम करत होता त्यांना चीनी प्रचारतंत्र राबविण्यासाठी पैसा पुरवला जात होता. काँग्रेसने या न्यूजक्लिकला पाठिंबा दिला होता हे विसरू नका.