मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात सचिनने ट्वीट करून माहिती दिली आहे. सध्या सचिन होम क्वारंटाईनमध्ये असून डॉक्टरांच्या सर्व सुचनांचे पालन करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
या ट्वीटमध्ये त्याने म्हटले आहे की, “कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमी चाचण्या करत होतो, परंतु मी आता कोरोना पॉजिटिव्ह आलो आहे. त्याबरोबरच मला मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसत आहेत. घरातल्या इतर सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी घरीच क्वारंटाईन झालो आहे, आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करत आहे. मला पाठिंबा देणाऱ्या आणि देशभरात कार्यरत असणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी आभार मानू इच्छितो.”
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
हे ही वाचा:
औरंगजेबाची मराठ्यांवरील पहिली शाही स्वारी- शाईस्ताखान (भाग ६)
राज्यात विविध ठिकाणी अग्नितांडव
क्रिकेटचा देव म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने रस्ता सुरक्षेसाठी आयोजित करण्यात आलेल्या मालिकेत इंडिया लिजंड्स संघाचे नेतृत्व केले होते. २१ मार्च रोजी श्रीलंकेच्या समूहाला हरवून भारत या मालिकेतील विजय प्राप्त केला होता.
सचिन तेंडुलकर भारत सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या जनजागृती मोहिमेतही सहभागी झाला होता. त्याच्यासोबत सौरव गांगुली, राहुल द्रवीड, यासारख्या माजी दिग्गज खेळाडूंनी देखील या मोहिमेत सहभाग नोंदवला होता.