ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवास्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या आवारात विषारी जातीचा साप आढळल्याची माहिती समोर आली. रविवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्कू करण्यात आले. सापाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कलानगर बांद्रा पूर्व येथील मातोश्री निवासस्थानाहून दुपारी २ च्या सुमारास वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशन संस्थेला फोन गेला. बंगल्याच्या आवारात साप असल्याचे त्यांना कळविण्यात आले. त्यासाठी सर्पमित्राची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. फोन येताच सर्पमित्र अतुल कांबळे हे मातोश्री निवासस्थानी दाखल झाले.
तेव्हा हा साप नसून नाग असल्याचे लक्षात आले. हा नाग पाण्याच्या टाकीमागे बसलेला होता. हा ‘कोब्रा’ या विषारी जातीचा नाग असून त्याची लांबी अंदाजे ४ फूट होती. त्यानंतर सदर साप सुरक्षित पकडून त्याची माहीती ठाणे वनविभाग यांना देउन सदर हद्दीतील राउंड ऑफिसर रोशन शिंदे यांना फोन करून कळविण्यात आली. हा नाग हा पूर्णपणे व्यवस्थित असून त्याला वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जंगलात सोडण्यात आले, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टरस्ट्रोकने ठाकरेंना घरी बसवणारे मास्टर
ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’मधील कलाकारांचे पैसे बुडवले?
चांद्रयान लागले कामाला; चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले
नेमाडेंचा अजब इतिहास; औरंगजेबाच्या राण्यांना हिंदूंनी भ्रष्ट केले म्हणून काशीविश्वेश्वरावर हल्ला
दरम्यान या नागाचे फोटो आणि त्याला पकडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः घटनास्थळी असल्याचे दिसून येत आहे.