30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषभारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन

भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन

सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी रविवारी ६ ऑगस्ट २०२३ रोजी या हेरिटेज रनचे आयोजन

Google News Follow

Related

भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडने दुसऱ्या इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन- २०२३ चे आयोजन करत असल्याची घोषणा केली आहे. निरोगी जीवनशैली आणि दक्षिण मुंबईचा समृद्ध वारसा याबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी रविवारी ६ ऑगस्ट २०२३ रोजी या हेरिटेज रनचे आयोजन होत आहे.

ऐतिहासिक परिसर आणि असाधारण निओ-गॉथिक शैलीचे दर्शन घडवणाऱ्या इमारतींच्या वैशिष्ट्यांसह आकर्षक वास्तुरचनांच्या सौंदर्यासाठी दक्षिण मुंबई वारसा जिल्हा ओळखला जातो. मुंबईतील सर्वाधिक जुन्या वास्तुंपैकी काही वास्तूंचे संरक्षक असलेल्या भारतीय नौदलाला मुंबईच्या या वारशाचे संवर्धन करण्याचा आणि त्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा अतिशय अभिमान आहे.

इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन- २०२३ म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेल्या या जिल्ह्यातील वारसास्थळांकडे लक्ष वेधून घेणारा आणि या शहराच्या ऐतिहासिक भूतकाळाशी अधिक जास्त प्रमाणात जोडून घेण्यासाठी सहभागींना प्रोत्साहित करणारा आणि नागरिकांमध्ये या वारशाबाबत अभिमानाची आणि आपलेपणाची भावना निर्माण करणारा आणि या प्रक्रियेदरम्यान सहभागी आणि प्रेक्षक यांना सारख्याच प्रमाणात अविस्मरणीय अनुभव देणारा एक मंच आहे.

१३ ऑगस्ट २०२२ रोजी इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रनचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ऐतिहासिक वारसा आणि तंदुरुस्ती प्रेमी यांनी सारख्या प्रमाणात एकत्र सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आणि त्यामध्ये ५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली होती. या रनमध्ये सहभागींना धावण्याच्या मार्गावर ३७ वारसा स्थळांचे अवलोकन करण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. शहराचा मानबिंदू असलेल्या गेटवे ऑफ इंडियाजवळ या दौडीचा समारोप झाला, ज्या ठिकाणी जमा झालेल्या सहभागींनी मुंबईचा अभिमान असलेल्या या वास्तूच्या परिसराच्या सौंदर्याचा आनंद घेतला आणि त्याची प्रशंसा केली.

हे ही वाचा:

नवे शैक्षणिक धोरण देशासाठी गेम चेंजर

कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

लॅपटॉपच्या आयातीवर १ नोव्हेंबरपासून बंदी

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा न्यायालयातच राजीनामा

इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन- २०२३ साठी यंदा ६ हजार ५०० धावपटूंनी नोंदणी केली आहे. ही दौड १० किमीच्या ‘वरुण रन’ आणि ५ किमीच्या ‘समुद्र रन’ या दोन वेगवेगळ्या अंतरांच्या श्रेणींमध्ये आयोजित होणार आहे. अतिशय काळजीपूर्वक रचना करण्यात आलेल्या या दौडीच्या मार्गावर सहभागींना या ऐतिहासिक स्थळांदरम्यान दक्षिण मुंबईतील अद्भुत वास्तुरचना आणि सांस्कृतिक स्थळांचे दर्शन घडणार आहे. सर्व धावपटूंची सुरक्षा आणि त्यांचा आनंद सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलाने व्यावसायिक शर्यत व्यवस्थापन भागीदार, अनुभवी वैद्यकीय पथके आणि स्वयंसेवकांची मदत घेतली असून त्यांना या दौडीच्या मार्गावर जागोजागी सहभागींना मदत करण्यासाठी त्याचबरोबर प्रोत्साहन देण्यासाठी तैनात केले जाणार आहे. या भागीदारींमधून मुंबईची भावना आणि शहराच्या समृद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न अधोरेखित होत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा