28 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरराजकारणगद्दार म्हणता आणि ५० कोटीसाठी पत्र पाठवता?

गद्दार म्हणता आणि ५० कोटीसाठी पत्र पाठवता?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात उद्धव ठाकरेंवर केला घणाघात

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस गाजवला. ५० खोके एकदम ओक्के अशा घोषणा देत गेले जवळपास वर्षभर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या आमदारांना डिवचणाऱ्या ठाकरे गटाविरोधातील एक मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी आपल्या या भाषणादरम्यान केला.

 

ते म्हणाले की, खूप गोष्टी आहेत, ज्या सांगता येतील पण आपण संयम बाळगतो. आम्हाला बोलता येत नाही असे समजू नका. ५० खोके ५० खोके तुम्ही करता पण आम्हाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यावर आपण उद्धव ठाकरेंच्या गटाला ५० कोटी दिले. आमच्या आमदारांना गद्दार, खोके असे शब्द तुम्ही सतत वापरता पण याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण हे लोकांना कळलेच पाहिजे. ५० खोके बोलून रोज आम्हाला शिव्याशाप देता. पण शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी द्या म्हणून आम्हालाच पत्र देता. हे पैसे शिवसेनेच्या खात्यातील आहेत. पण हे पैसे तात्काळ आमच्या खात्यात जमा करा म्हणून मागणी करण्यात आली पत्र पाठवून.

 

आम्हाला गद्दार म्हणायचं, शिव्याशाप द्यायचे. आम्हाला खोके म्हणायचं मग खरे खोकेबाज कोण? मात्र आम्ही त्या पैशावर डोळा ठेवला नाही. तात्काळ ते पैसे देऊन टाकले. तुमची संपत्ती आम्हाला नको. बाळासाहेब ठाकरेंचे विचार हीच आमच्यासाठी संपत्ती आहे. ज्यांना बाळासाहेबांशी देणेघेणे नाही केवळ त्यांचा या ५० खोक्यांवरच डोळा होता. खरेतर सांगण्यासारखे खूप आहे पण हे एकच काढले.

 

रोकडे बंद झाले की खेकडे दिसतात

मुख्यमंत्र्यांनी घणाघात केला. ते म्हणाले की, हे ठाकरे यूज अँड थ्रो कधी करतील कुणाला माहीत पडणार नाही. म्हणून खेकड्याचा विषय काढला त्यांनी. रोकडे संपले की खेकड़े दिसायला लागतात. त्यामुळे खेकड्याची वृत्ती कुणाची हे सर्वांना ठाऊक आहे. ठाकरे गटावर सडकून टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा आमच्या संपर्कात, तो आमच्या संपर्कात म्हणता. असे सगळे संपर्कात असते तर अशी वेळ आली नसती. प्रेमाचे दोन शब्द महत्त्वाचे असतात. मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही.

 

हे ही वाचा:

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांचा सभात्याग

वसुलीच्या उद्योगावरही एखादी श्वेतपत्रिका हवी

केदारनाथ यात्रेच्या मुख्य मार्गावर दरड कोसळून १३ लोक बेपत्ता

२००व्या टी-२० सामन्यात भारत वेस्ट इंडिजकडून पराभूत

इर्शाळवाडीत गेलो तेव्हा अजित पवार वॉर रूममध्ये होते. फडणवीस सभागृहात होते. आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. तिथे गेलो म्हणून सगळी यंत्रणा कामाला लागली. एनडीआरएफ टीमला आधार मिळाला. मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनाही टोला लगावला. मुख्यमंत्री जाणार म्हणे. मी म्हटले माझ्याच जिल्ह्याच्या माणसाला काय त्रास झाला. जेव्हा आपण म्हणतो ना की जाणार जाणार तेव्हा त्याचा खुटा बळकट होतो.

ग्रँड हयातमध्ये काय घडले?

उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार करताना मुख्यमंत्र्यांनी ग्रॅंड हयातची आठवण सांगितली. अजित पवारांना उद्देशून शिंदे म्हणाले की, तुम्ही मी, तटकरे होतो तिथे. एवढ्या उभ्या हयातीत काढले नसेल एवढे त्या व्यक्तीने आमच्यासमोर काढले. एवढी बदनामी? वेळ येईल तेव्हा बोलेन सगळे. अशी परिस्थिती कुणावरही येऊ नये.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा