28 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरविशेषकेदारनाथ यात्रेच्या मुख्य मार्गावर दरड कोसळून १३ लोक बेपत्ता

केदारनाथ यात्रेच्या मुख्य मार्गावर दरड कोसळून १३ लोक बेपत्ता

गौरीकुंड येथे भूस्खलन होऊन घडली दुर्घटना

Google News Follow

Related

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाःकार माजला असून दरड कोसळण्याची घटना घडली आहे. केदारनाथ यात्रेचा मुख्य मार्ग असलेल्या गौरीकुंड येथे भूस्खलन होऊन ढिगाऱ्याखाली साधारण १३ लोक दबले गेल्याचे वृत्त आहे. गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, भूस्खलनात १० ते १३ लोक गाडले गेल्याची किंवा वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गौरीकुंडमध्ये पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे बचाव पथकासाठी अडचणी निर्माण होत आहेत. दगड सतत कोसळत असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. बेपत्ता लोकांची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. रुद्रप्रयाग पोलिसांव्यतिरिक्त, SDRF, DDDRF आणि इतर अनेक बचाव पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत.

रुद्रप्रयागच्या गौरीकुंडमध्ये गुरुवारी पावसाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा या पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे डोंगरावर दरड कोसळली. या घटनेत दोन दुकानांचे नुकसान झाले. येथे काम करणारे १३ लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पुणे विमानतळावर बॉम्ब आणल्याची धमकी

हरयाणातील हिंसाचारानंतर नूँहमध्ये बुलडोझर चालला

मणिपूरमध्ये हिंसाचाराचा भडका; चकमकींमध्ये २१ जण जखमी

अमित शहा लोकसभेत पंडित नेहरूंबद्दल बोलले…विरोधक झाले निरुत्तर!

या घटनेनंतर काही वेळातच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, SDRF आणि जिल्हा प्रशासनही पोहोचले. मुसळधार पावसामुळे दुकानात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढता आले नाही. यापैकी काही लोक स्थानिक तर काही लोक नेपाळमधील आहेत, अशी माहिती समोर आली आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. रात्र होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्य थांबवावे लागले होते. सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा