एकाच वेळी अनेक जिल्ह्यात औरंगजेबाचे फोटो नाचवणे हा काही योगायोग नाही. हा प्रयोग आहे, असा गंभीर गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना केला. आजपर्यंत भारतीय मुसलमानांचा हिरो कधी औरंजेब नव्हता. या देशाचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच होऊ शकतात. एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात. पण औरंगजेब होऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ठणकावून सांगितले.
ज्याप्रकारे संभाजी महाराजांचा छळ करून त्यांच्या शरीराचे तुकडे केले गेले तो औरंगजेब हिरो होऊच शकत नाही. अचानक औरंगजेबाचं महिमामंडन सुरू झालं आहे. त्यामागे काही डिझाईन आहे. काहींना अटकही केली आहे. धर्माच्या आणि जातीच्या आधाराव भेदभाव करणार नाही. पण औरंगजेबाचं कोणी महिमामंडन करत असेलत तर सोडणारही नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला
राज्यातील मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडल्या असून विरोधकांनी वारंवार सरकारवर टीका केली होती. सरकारमुळेच या निवडणुका रखडल्याचा दावा विरोधकांनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, राज्य सरकारने निवडणुका अडवून ठेवलेल्या नाहीत. निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. मुंबई महापालिकेसह सर्व पालिकेच्या निवडणुका आम्हाला हव्या आहेत. आम्ही तयारीत आहोत. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाता येत नाही. तरीही आपल्याला वाटत असेल तर निवडणूक आयोग स्वायत्त आहे. तुम्ही जाऊन त्यांच्याकडे माहिती घ्या, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
हे ही वाचा:
पुणे विमानतळावर बॉम्ब आणल्याची धमकी
मुंबईत समुद्र किनाऱ्यावर आढळले दोघा भावांचे मृतदेह
इस्रायलचे ‘स्पाईक’ वाढवणार भारतीय वायूदलाची ताकद!
बारसू आंदोलनाला बंगळुरूमधून फंड
बारसू आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. बारसू आंदोलनासाठी बंगळुरूतून पैसा मिळाला आहे. बंगळुरूतून फंडिंग झालं आहे, असा गंभीर आरोप करतानाच तेच तेच लोक प्रत्येक आंदोलनात कसे दिसतात? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.