ठाणे रेल्वे स्थानकातून १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तीच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रेल्वे गुन्हे शाखेने रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथून ५५ वर्षीय नराधमाच्या मुसक्या आवळून पीडित मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली आहे.याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या ५५ वर्षीय नराधमाविरुद्ध अपहरण, लैगिग अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वपोनि. कांदे यांनी दिली.
पीडित मुलगी ही १४ वर्षांची असून ती कुटुंबासह भिवंडी येथील वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास असून मुलीचे आई वडील त्याच परिसरात मजुरीचे काम करतात. गेल्या आठवड्यात पीडित मुलगी ही एका मैत्रिणीसोबत ठाण्यात फिरण्यासाठी आली होती. दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकातून तीचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण करणारा हा ओळखीचा प्रभू बाग (५५) हा असल्याची माहिती मैत्रिणीने पोलिसांना दिली.
ठाणे रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.या गुन्ह्याचा संलग्न तपास रेल्वे स्थानिक गुन्हे शाखा हे देखील करीत होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरशूद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर आणि पथक करीत होते. या पथकाने ठाणे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करून अपहरणकर्त्याची माहिती मिळवली असता अपहरण कर्ता हा पीडित मुलीला घेऊन रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील बांधकाम साईटवर गेला असल्याची माहिती मिळाली.
हे ही वाचा:
चित्त्यांबाबत चिंता वाटणारे पत्र आपण लिहिलेच नाही! तज्ज्ञांचे स्पष्टीकरण
सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ३७० बाबत कपिल सिब्बल यांची तासमपट्टी
अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ज्ञानव्यापी मशीद सर्वेक्षणाला हिरवा झेंडा
नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह, एडेलवेस कंपनीची चौकशी होणार
गुन्हे शाखेच्या पथकाने अपहरणकर्त्याचा माग काढून बुधवारी गोरेगाव येथून अपहरणकर्ता प्रभू बाग याला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. आरोपी आणि मुलीला ठाणे रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. ठाणे रेल्वे पोलिसांनी दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात प्रभू बाग याला अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तीच्यावर लैगिग अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी गुन्हयातील कलमात वाढ करून लैगिग अत्याचार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे.
अपहरणकर्ता हा विवाहित असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नीचे निधन झाले आहे. त अपहरणकर्त्याला दोन मुले असून दोन्ही मुलाचा विवाह झालेला आहे.मागील काही महिन्यांपासून अपहरण कर्त्याची पीडित मुलीवर वाईट नजर होती अशी माहिती समोर आली आहे.