महाराष्ट्रातील विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसच्या नेत्याची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनाम दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची या पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसची आमदार संख्या असल्याने काँग्रेसकडून या पदावर दावा करण्यात आला होता.
अखेर महाविकास आघाडीने विरोधी पक्ष नेते पदाचा मुद्दा मार्गी लावला असून विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना मिळाल्याची माहीती समोर आली आहे. हे पद सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे परत आले आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन नेत्यांची नावे चर्चेत होती. अखेर विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा मंगळवार, १ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असून विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर महाविकास आघाडीतील हा पेच सुटला आहे.
हे ही वाचा:
जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती
एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त
ठाण्यात गर्डर लाँचर कोसळून १७ जणांचा मृत्यू
…तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत
अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड केल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. मात्र, जास्त संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता. त्यानुसार विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.