24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषजसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती

१८ ऑगस्टपासून डब्लिन येथे आयर्लंविरुद्ध तीन टी- २० सामने सुरू होत आहेत

Google News Follow

Related

क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहला दुसऱ्या फळीतील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखालील भारत संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी २० सामने खेळेल. हे सामने १८ ते २३ ऑगस्टदरम्यान रंगणार आहेत. हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे तर ऋतुराज गायकवाडला टी- २० संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

जसप्रीत बुमराह ऑगस्टमध्ये आयर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. सप्टेंबर २०२२ पासून मैदानापासून दूर राहिलेल्या या वेगवान गोलंदाजाला अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
१८ ऑगस्टपासून डब्लिन येथे आयर्लंविरुद्ध तीन टी- २० सामने सुरू होत आहेत. यासाठी निवड समितीने संघाची निवड केली आहे. चीनमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या खंडीय बहु-क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी त्यांना खेळण्याच्या चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी काही खेळाडूंची निवड केली आहे.

जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता आणि गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकाला मुकला होता. सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी- २० मालिकेत तो शेवटचा खेळला. पाठीच्या सततच्या समस्यांमुळे बुमराहची मार्च २०२३ मध्ये न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर, बुमराहने बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सराव सुरू केला. बुमराह हा ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप संघाचा भाग असण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

हे ही वाचा:

एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

ठाण्यात गर्डर लाँचर कोसळून १७ जणांचा मृत्यू

…तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर अजूनही शिल्लक १९९९चे प्रकरण

आयर्लंड टी- २० साठी भारताचा संघ

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

असे असतील सामने

सर्व सामने डब्लिन येथील द व्हिलेज येथे होतील.

  • पहिला सामना – शुक्रवार, १८ ऑगस्ट
  • दुसरा सामना – रविवार, २० ऑगस्ट
  • तिसरा सामना – बुधवार, २३ ऑगस्ट
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा