24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेष...तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत

…तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत

राज्यांतील २५ पैकी २१ कुस्ती युनिटची बैठक घेतली

Google News Follow

Related

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचे आरोप आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतरही भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी डब्ल्यूएफआय वर आपले वर्चस्व कायम ठेवायचे आहे. सिंह यांनी १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील २५ पैकी २१ कुस्ती युनिटची बैठक घेतली. यामुळे जरी डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षपदी ब्रृजभूषण शरण सिंह नसले तरी निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या कुस्ती युनिटच्या बैठकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी नाव नोंदणी सोमवार पर्यंत होणार आहे.

 

 

असे मानले जाते की, ब्रृजभूषण शरण सिंह डब्ल्यूएफआयच्या सर्वोच्च पदांसाठी आपले उमेदवार उभे करू शकतात. पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीपूर्वी २५ पैकी २१ राज्यातील कुस्ती युनिटची बैठक घेतली.मात्र, ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या सभेपासून चार राज्यांचे युनिट्स दूर राहिले. ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यासोबत २१ राज्यांच्या युनिटचा सहभाग होता, तर निवडणुकीत भाग घेणारे चार राज्य दूरच राहिली यामध्ये गुजरात, आसाम,ओडिशा आणि हिमाचल प्रदेश युनिटचा समावेश आहे.

 

रविवारी या चार राज्यांच्या युनिटची बैठक वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याचे वृत्त आहे. एका माजी कुस्ती अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतेक युनिट्स बोर्डवर आहेत आणि सोमवारी ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यासोबतच्या पुढील बैठकीत रणनीती ठरवतील. आमच्यात फूट पाडण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहे मात्र, आम्ही एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली न्यायालयातील लैंगिक शोषणाचा खटला सुरू आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यांच्या जामीन अर्जाला दिल्ली पोलिसांनी देखील विरोध केला नाही. यावेळी ब्रृजभूषण शरण सिंह त्यांचा मुलगा करण सिंह आणि जावई यांचा इलेक्टोलर कॉलेजमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.मात्र, त्यांचा दुसरा जावई विशाल सिंह याचा निवडणूक यादीत समावेश आहे, जो बिहार युनिटचा आहे. शरण सिंह यांचा कार्यकाळही जुलैमध्ये पूर्ण झाला. नियमानुसार बारा वर्षापेक्षा जास्त काळ कोणीही डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष राहू शकत नाहीत.

हे ही वाचा:

पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून आणखी काही दिवसांची मुदतवाढ

अतिक अहमदला आव्हान देणाऱ्या ‘सपा’च्या आमदार पूजा पाल भाजपमध्ये जाणार ?

पुण्यातून पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा, ड्रोन फुटेज जप्त

संभाजी भिडेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या यशोमती ठाकूर यांना धमकी !

सिंह आपला उमेदवार उभा करू शकतात ? 

१२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीत ब्रृजभूषण शरण सिंह सहभागी होणार नसले तरी त्यांचा महासंघात मोठा प्रभाव असू शकतो. अनेक दिवसांपासून बजरंग पुनिया,साक्षी मलिक आणि विनेश फोगट या कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण शरण सिंह यांना विरोध केला होता. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी डब्ल्यूएफआयच्या पदांचा राजीनामा दिला होता. ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या बैठकीत सहभागी न झालेल्या चार राज्यांपैकी गुजरात युनिटच्या रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे सचिव प्रेमचंद लोचक अध्यक्षपदासाठी आपले नाव पुढे करू शकतात.

 

 

दुसरीकडे हरियाणातील भाजपचे राजकारणी आणि मन्नत ग्रुप ऑफ हॉटेलचे मालक तसेच आसामचे प्रतिनिधित्व करत असलेले देवेंद्र सिंग गदायन हे देखील अध्यक्षपदाची दावेदार असू शकतात. ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात साक्षीदार असलेल्या अनिता शेवरण ज्या उडीसा युनिटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या देखील उमेदवारी दाखल करू शकतात. हिमाचल प्रदेशाचा विचार करता येतील वाद मिटला असून २३ जुलै रोजी राज्य कार्यकारिणी संघटनेची निवडणूक घेण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी न्यायमूर्ती एमएम कुमार यांनी अध्यक्ष कुलदीप सिंग आणि सरचिटणीस राजेंद्र सिंग यांना निवडणुकीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा