24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषसंभाजी भिडेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या यशोमती ठाकूर यांना धमकी !

संभाजी भिडेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या यशोमती ठाकूर यांना धमकी !

ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याचा दिला इशारा

Google News Follow

Related

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक – अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अमरावती येथील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या विरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

संभाजी भिडे यांनी काही दिवसापूर्वी अमरावती येथील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल बद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवत भिडे विरोधात आंदोलन करण्यात आले.संभाजी भिडे यांच्या व्यक्तव्याला काहींनी समर्थन केले आणि विरोधही केला.यशोमती ठाकूर यांनीही भिडेंचा विरोध केल्याने त्यांना ट्विटरच्या माध्यमातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली.

 

हे ही वाचा:

हिंदू-मुस्लिम सौहार्द हवे तर जबरदस्तीने धर्मांतरण, लव्ह जिहाद थांबले पाहिजे!

आरपीएफ जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये अधिकाऱ्यासह चार जणांना घातली गोळी

शूर सैनिकांसाठी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम !

दगडूशेठ गणपती दर्शन, लोकमान्य टिळक पुरस्कार, मेट्रो उद्घाटन… मंगळवारी पंतप्रधान पुण्यात

यशोमती ठाकूर यांनी म्हणाल्या होत्या,’भारतातील थोर महापुरुष तसेच संतांबद्दल मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजी सतत काहीतरी बरळत असतात त्यांना तात्काळ अटक करावी.  सरकार आमच्यावर गुन्हे दाखल करु शकते पण मनोहर कुलकर्णी जे बोलत आहेत,  त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही आहे. यावरुनच त्यांचा हेतू काय हे स्पष्ट होते.’ यानंतर यशोमती ठाकूर याना ट्विटरच्या माध्यमातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा