इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बे मध्ये नॉनव्हेज खाण्यावरून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. वृत्तानुसार वस्तीगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार खाल्ल्याने एका विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याने अपमानित केल्याची घटना घडली. आयआयटीच्या विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडिया टूडेला सांगितले की, गेल्या आठवड्यात हॉस्टेल क्रमांक १२ च्या कॅन्टीनमध्ये ही घटना घडली.विद्यार्थ्यांने दावा केला की काही विद्यार्थ्यांनी कॅन्टीनच्या भिंतीवर पोस्टर चिटकवलेले होते, ज्यावर तेथे फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी असल्याचे लिहिले होते.
तीन महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आरटीआय दाखल करून संस्थेकडून फूड पॉलिसीची माहिती मागविली होती. यावेळी त्यांना सांगण्यात आले की, संस्थेत जेवणाबाबत वेगळी मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. तथापि संस्थेने अजूनही विद्यार्थ्यांसाठी भोजनाच्या पर्यायांवर आधारित स्वतंत्र आसन व्यवस्था ठेवली आहे. हे प्रकरण काही विद्यार्थ्यांनी ट्विटरवर मांडत संताप जनक म्हटले आहे. आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल (APPSC) नावाच्या विद्यार्थ्यांच्या गटाने ट्विट केले, आरटीआय आणि मेल्स वरून असे दिसून आले आहे की संस्थेचे वस्तीगृह Gsec साठी ‘फूड सेग्रीगेशन’ बाबत कोणतेही धोरण नाही. काहींनी मेसचा काही भाग साकारण्यासाठी राखून ठेवला आहे. त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांना त्यापासून दूर बसावे लागते.
हे ही वाचा:
युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला
कोंढव्यातील दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती
स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
काश्मीरच्या कुलगाममध्ये सैनिक बेपत्ता; गाडीत सापडले रक्त
विद्यार्थ्यांमध्ये भेदभावाला प्रोत्साहन देण्याचा आरोप
विद्यार्थ्यांच्या एका गटाने केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, शुद्धतेच्या कल्पनेसाठी खाद्यपदार्थांची वेळोवेळी ठिकाणे ठरवणे चुकीचे आहे. कॅम्पसमधील उच्चवर्णीयांचे श्रेष्ठत्व बळकट करण्याचा आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी डीबीएच्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगल्या म्हणून मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत सोशल मीडियावर मोहीमही सुरू केली. ते म्हणतात की, हे नियम कॅम्पस मधील विशिष्ट गटांमधील श्रेष्ठतेच्या कल्पनेला बळकटी देते.या घटनेचा निषेध करत APPSCने कॅन्टीन मध्ये लावलेले पोस्टर्स फाडून टाकले. त्यांचे म्हणणे आहे की, हे असे पोस्टर्स लावणे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्यासारखे आहे.
यापूर्वीही २०१८मध्ये अन्न मार्गदर्शक तत्त्वांवर गदारोळ झाला होता. त्यादरम्यान मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्लेट वापरण्यास सांगणारे परिपत्रक जारी करण्यात आले होते. यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. वास्तविक वस्तीगृहाच्या मेस कौन्सिलने विद्यार्थ्यांना याबाबत ई-मेलही पाठवले होते.त्यात म्हटले होते की,जे मांसाहार करतात त्यांनी स्वतंत्र ताट वापरावे. मांसाहार खाणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे त्यांच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांची मागणी असल्याकारणाने ही मागणी लक्षात घेऊन मेस कौन्सिलने ही मार्ग सूचना जारी केली असल्याचे सांगितले होते.