सोलापुरातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुजू झालेले नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यामुळे नवीन वाद सुरु झाला आहे. राजेंद्र शेळके यांचा मुलाचा देवाला दुधाने अभिषेक करीत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.यामुळे वारकरी संप्रदायातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेच्या बातम्या माध्यमात आल्यावर कार्यकारी अधिकारी शेळके यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त केली आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक येत असतात.मात्र, सर्वांनाच मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत नाही तसेच पूजेचा मानही मानकऱ्यांनाच असतो, तरीसुद्धा लाखो भाविक मंदिराच्या पायरीवर नतमस्तक होण्यासाठी विठ्लाच्या दर्शनासाठी जात असतात. आपल्या पदाचा दुरुपयोग करून हा मान आपल्या परिवारातील व्यक्तीला देण्याचा प्रयत्न काही कार्यकारी अधिकारी करीत असतात.आत्ताच मंदिरात रुजू झालेले नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करताना आढळले. शेळके यांचा मुलगा देवाला दुधाने अभिषेक करीत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर वारकरी संप्रदायातून संतप्त प्रितिक्रिया उमटू लागल्या.
विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेच्यावेळी कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या कडून रुक्मिणीची पूजा तर मंदिर सदस्य संभाजी शिंदे यांच्या कडून विठ्ठलाची पूजा झाली होती. यावेळी शेळके यांच्या मुलाकडून विठ्ठलाला शंखातून अभिषेक घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर वारकरी संप्रदायातून याला आक्षेप घेण्यास सुरुवात झाली होती . आम्ही २५ हजाराची पूजा करूनही आम्हाला असा अभिषेक करता येत नसताना अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून त्याला हा अधिकार मिळाला का असा आक्षेप घेण्यास सुरुवात झाली . यानंतर तातडीने मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करीत पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
हे ही वाचा:
मणिपूरचा राग नाशिकमध्ये, १० पोलिस दगडफेकीत जखमी !
दोन दशकानंतर टाटा समूहाचा आयपीओ शेअर बाजारात येणार
अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग; रुग्णांची झाली पळापळ, पण जीवितहानी नाही
मोदींना हुकूमशाह म्हणणारे उद्धव ठाकरे सोनिया गांधींपुढे लोटांगण घालतात !
देवाच्या पूजेचा अधिकार कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला असतो, मग मुलाला असा अभिषेक कसा करता आला असा मुद्दा घेऊन वारकरी संप्रदायातील मंडळी आक्षेप घेऊ लागली होती. विठ्ठल भक्तांकडून अभिषेक किंवा पूजा असताना कोणत्याही भाविकाला देवाला हात लावू दिला जात नाही आणि असा अभिषेक देखील करता येत नाही. त्यामुळेच वारकरी संप्रदायाकडून या तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या.यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. विठ्ठल जोशी यांनी प्रक्षाळ पूजेच्यावेळी विठ्ठलासमोर स्नान केले म्हणून त्यांचेवर देखील खूप टीका झाली होती. आता या नवीन कार्यकारी अधिकारी यांच्या लहान मुलाने केलेला अभिषेक चर्चेत आला आहे.
वास्तविक राजेंद्र शेळके हे महिन्यापूर्वीच मंदिरात रुजू झाले असून त्यांना अजून मंदिराचे नियम , प्रथा परंपरा याबाबत माहिती नसली तरी मंदिराच्या इतर प्रशासकीय अधिकारी वर्गाने याबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे असताना ते न देता उलट हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कार्यकारी अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे.या सर्व प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करताना शेळके यांनी दिलगिरी व्यक्त करत या सर्व प्रकारची चौकशी करण्यात येईल,असे सांगितले आहे.