26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामाफोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला

फोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला

Google News Follow

Related

फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मी सीताराम कुंटे यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, असे मला वाटते. तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला आणि भाजपवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक त्रुटी आहेत. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न असेल तेव्हाच फोन टॅप करता येतात, असे अहवालात म्हटले आहे. पण कायद्यानुसार एखादा गुन्हा होण्याचा संशय असेल तर फोन टॅपिंगची परवानगी असते. नेमकी हीच ओळ अहवालातून वगळण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडूनही (एसीबी) याच कलमाखाली फोन टॅप केले जातात. त्यामुळे फोन टॅपिंगसंदर्भातील राज्य सरकारचा संपूर्ण अहवालच सदोष आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

हे ही वाचा:

सनराईज कोविड सेंटरमधील मृत्यु शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी

नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याला सुरूवात

संजय राऊतांचे युपीए २ चे इमले

मेळघाटात वनाधिकाऱ्यांची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक प्रकार उघड

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनीच तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणेच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असे सुचविले होते. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा