राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, २९ जुलै रोजी दिले. वाडा- भिवंडी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम दर्जेदार आणि वेळेत व्हावे. निकृष्ट कामासाठी संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या दोन्ही रस्त्यांवरून ठाणे आणि मुंबई शहर परिसरात येणाऱ्या वाहतुकीचे नियमन करा. अवजड आणि मालवाहतुकीच्या वाहनांसाठी वेळेचे नियोजन करा, जेणेकरून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक स्वतंत्र टास्क फोर्स ची स्थापना करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक कुंडीच्या बाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे तसेच इतर काही आमदारांनी पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीला पालकमंत्री दादा भुसे, बांधकाम विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आमदार सत्यजित तांबे दौलत दरोडा यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा:
मालाड सामान्य रुग्णालयात तीन महिन्यांत दहा डायलेसिस मशीन सुरू करणार
भारत जगाचे औषधालय बनला असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ
राज्यात सॅटेलाईट कॅम्पसमुळे स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील
नाशिक महामार्गाच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई नाशिक महामार्गावर ती एक वेळापत्रकाची आखणी करण्यात येणार आहे. त्यानुसार अवजड वाहने या मार्गावरून धावतील, इतर वेळेत ही वाहने वाहनतळावर उभी करण्याचा निर्णय झाला. ही वाहने उभी करण्यासाठी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे या भागात शक्य असतील तेथे रूंदीकरण करून रस्ते प्रशस्त करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच बैठकीत ठरल्याप्रमाणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्राधिकरण, ” सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस यांचाटास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. टास्क फोर्स रोजच्या रोज वाहतुकीचा आढावा घेऊन उपाय करतील. नाशिक मुंबई रस्त्याची दुर्दशा झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याच्या दुर्दशेस केवळ कंत्राटदार नाही, तर अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याचा निर्णय झाला.