“भारत जगाचे औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे,” असे केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. ‘भारतातील रसायने आणि पेट्रोकेमिकल उत्पादन केन्द्र’ (GCPMH- 2023) यावरील तिसऱ्या जागतिक शिखर परिषदेचे समारोपाचे भाषण करताना ते बोलत होते. “शाश्वतता आणि वर्तुळाकार परिपूर्णता” ही परिषदेची संकल्पना होती. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने (फिक्की) याचे आयोजन केले होते.
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरतेसाठी उद्योगांची भरभराट आवश्यक असते यावर त्यांनी भर दिला. यासंदर्भात उद्योगांना पाठबळ देण्याची सरकारची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. “सरकार म्हणून आम्ही वरवरचा विचार करण्याऐवजी सर्वंकष विचार करतो.” व्यापक उद्योगांसाठी कमाल प्रशासन किमान सरकार अशी सर्वंकष परिसंस्था आम्हाला उभारायची आहे असे ते म्हणाले. या क्षेत्रातील प्रगती आणि सकारात्मक बदलांसाठी नवोन्मेषी तसेच शाश्वत उपाय सुचवण्याचे आवाहनही डॉ मांडवीय यांनी यावेळी केले.
केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाचे रसायने आणि पेट्रोकेमिकल विभागाचे सचिव अरुण भारको यांनी या दोन दिवसीय परिषदेचा धांडोळा घेतला. या शिखर परिषदेने, केंद्र आणि राज्य सरकारे तसेच उद्योगांना संवाद साधण्यासाठी एक सहयोगी व्यासपीठ उपलब्ध केले असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
राज्यात सॅटेलाईट कॅम्पसमुळे स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील
नाशिक महामार्गाच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ठाकरे गटाने नाणारला विरोध करुन पाकिस्तानला मदत केली?
अवैध बांधकाम तोडण्यासाठी हवे तर योगींकडून बुलडोझर उसने घ्या!
परिषदेच्या संकल्पनेशी सुसंगत असणाऱ्या, निधी तसेच पर्यावरण विषयक मंजुरी, या रसायने आणि पेट्रोकेमिकल उद्योगातील महत्त्वाच्या पैलूंवर त्यांनी लक्ष वेधले. उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या अनेक प्रमुख उद्योजकांनी परिषदेत भाग घेतला.