भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कोकणातील नाणार येथे होणाऱ्या सर्वात देशातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध करुन सरळ पाकिस्तानला मदत केली का? असा गंभीर आणि संतप्त सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांनी ट्वीट केले आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीट केलेल्या माहितीनुसार, कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. नाणार प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्को या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी ‘नवशक्ती’ या वर्तमानपत्रात आली आहे. यावरून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे. प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या ना? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती ना? असे सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत. उद्धव ठाकरेंनी नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली? असा गंभीर आरोप आशिष शेलारांनी केला आहे.
◆ कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.
◆ या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.
◆ १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या… pic.twitter.com/bClTAg5SJr— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 29, 2023
हे ही वाचा:
अवैध बांधकाम तोडण्यासाठी हवे तर योगींकडून बुलडोझर उसने घ्या!
मध्य प्रदेशमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार
चिन्ह, नावाबाबत ठाकरे हतबल पवार सुशेगात
पाकिस्तानमधील भाच्यांची भारतातील मामाशी भेट होणार
काही दिवसांपूर्वी बारसू येथील प्रकल्पावरुन वाद पेटला होता. स्थानिक आणि प्रशासन यांच्यात हा मुद्दा पेटला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेतली होती. मोठा प्रकल्प देऊ असे पंतप्रधान मोदी म्हणत होते तो हाच का विनाशकारी रिफायनरी प्रकल्प, असा सवाल उठवत ठाकरेंनी टीका केली होती.