भांडूप ‘ड्रीम मॉल’ या, ओसी न मिळालेल्या इमारतीत सुरू झालेल्या सनराईज कोविड हॉस्पिटलला आग लागून १० जणांचा मृत्यु झाला आहे. पीएमसी बँकेतील घोटाळ्यात संबंध असलेल्या वाधवान कुटुंबाचा या हॉस्पिटलशी थेट संबंध आसून त्याच्यामुळेच शिवसेनेने या हॉस्पिटलला ओसी नसताना मंजूरी देण्याची कृपा केली आहे. टक्केवारीच्या मोहापायी १० लोकांचा बळी गेला आहे.
या प्रकरणाबद्दल सरकारविरोधात जोरदार टिका केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळावर घटनेला सुमारे १२ तास उलटून गेल्यानंतर पोहोचले होते, याबद्दल देखील संताप व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याला सुरूवात
मेळघाटात वनाधिकाऱ्यांची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक प्रकार उघड
भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील यावरून टिका केली आहे. यावेळी भातखळकर यांनी असे म्हटले आहे की, भांडुपच्या ड्रीम मॉल मधील सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आग प्रकरणी तेथे अनधिकृतपणे कोविड सेंटर उभे राहते याची साधी माहिती सुद्धा महानगरपालिकेला नसल्याचे स्वतः महापौर कबूल करतात, या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच शिवसेनेने या मॉल वर व अनधिकृतपणे उभे राहिलेल्या या सनराईज हॉस्पिटल वर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे काय? असा सवाल करत, या मॉल व हॉस्पिटल च्या संचालक व व्यवस्थापकीय मंडळासोबतच हा मॉल व हॉस्पिटल बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यासाठी ज्यांचा वरदहस्त आहे, त्यांची सुद्धा सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
‘शिवसेनेचे निकटवर्तीय असलेल्या PMC बँक घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच महापालिकेचा भांडुपच्या ड्रीम मॉलला वरदहस्त आहे काय?’
मॉल मधील अनधिकृत सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी आहेत. pic.twitter.com/BXk8I1jUSE— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 26, 2021
याबरोबरच डिसेंबर महिन्यात भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घेण्यासाठीची वारंवार मागणी मी स्वतः केली होती. त्यावेळी उघड झालेल्या माहितीत मुंबईमध्ये १३९० रुग्णालये व नर्सिंग होम अनधिकृतपणे सुरू असल्याची व तेथे कोणत्याही प्रकारची आगरोधक सुरक्षा नसल्याचे समोर आले होते. इतकेच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेकडून फेब्रुवारी महिन्यात करण्यात झालेल्या एका सर्व्हेनुसार २९ मॉलमध्ये अग्नी सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे समोर आले होते, आज ज्या ड्रीम मॉलला आग लागली त्याचा सुद्धा या यादीत समावेश होता. या आगीत दुर्दैवी मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची थेट आर्थिक मदत करण्यात यावी व हि रक्कम मॉल व रुग्णालयाकडून वसूल करावी’ अशी मागणी सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
वाधवान कुटुंबिय आणि ठाकरे सरकार यांचे संबंध यापुर्वी देखील उघड झाले आहेत. गेल्यावर्षी अवघा महाराष्ट्र लॉकडाऊन मध्ये असताना या कुटुंबियांना मात्र महाबळेश्वरला जाण्याची परवानगी ठाकरे सरकारच्या गृह खात्याचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. त्यावरून देखील ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यात आले होते.