27 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरराजकारणलोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून मोट बांधणीला सुरुवात

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून मोट बांधणीला सुरुवात

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल

Google News Follow

Related

आगामी वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीयांकडून मोट बांधणीला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांनीही भाजपाला पर्याय म्हणून इंडिया या नावाने आघाडी केली आहे. दरम्यान, मधल्या काळात काही महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

भाजपाकडून एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, नऊ सरचिटणीस आणि १२ सचिवांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.

भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नाड्डा यांनी शनिवार, २९ जुलै रोजी पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अंटोनी यांचे पुत्र अनिल अंटोनी यांचा समावेश भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीत केला असून त्यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच अनिल अँटनी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, पंकज मुंडे आणि विजया रहाटकर यांचा समावेश राष्ट्रीय सचिव म्हणून करण्यात आला आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि उत्तर प्रदेशमधील आमदार तारीक मन्सूर यांचा समावेश उपाध्यक्ष म्हणून करण्यात आला आहे. तसेच, तेलंगणा भाजपाचे माजी अध्यक्ष बांडी संजय कुमार यांचाही समावेश पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

सीबीआयकडून मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणात एफआयआर

छोटा शकीलचा शूटर लईक शेखच्या २५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मोहरमच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

मलकापूरमध्ये दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात प्रवाशांचा मृत्यू

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी

राष्ट्रीय उपाध्यक्ष

  • डॉ. रमण सिंह, आमदार (छत्तीसगड)
  • वसुंधरा राजे, आमदार (राजस्थान)
  • रघुबर दास (झारखंड)
  • सौदान सिंह (मध्य प्रदेश)
  • बैजयंत पांडा (ओडिशा)
  • सरोज पांडे, खासदार (छत्तीसगड)
  • रेखा वर्मा, खासदार (उत्तर प्रदेश)
  • डी. के. अरुणा (तेलंगणा)
  • एम. चौबा एओ (नागालँड)
  • अब्दुल्ला कुट्टी (केरळ)
  • लक्ष्मीकांत बाजपेयी, खासदार (उत्तर प्रदेश)
  • लता उसेंडी (छत्तीसगड)
  • तारिक मन्सूर, विधान परिषद सदस्य (उत्तर प्रदेश)

राष्ट्रीय महामंत्री

  • अरुण सिंह, खासदार (उत्तर प्रदेश)
  • कैलाश विजयवर्गीय (मध्य प्रदेश)
  • दुष्यंत कुमार गौतम (दिल्ली)
  • तरुण चुग (पंजाब)
  • विनोद तावडे (महाराष्ट्र)
  • सुनील बन्सल (राजस्थान)
  • संजय बंदी, खासदार (तेलंगणा)
  • राधामोहन अग्रवाल, खासदार (उत्तर प्रदेश)

राष्ट्रीय सचिव

  • विजया राहटकर (महाराष्ट्र)
  • सत्या कुमार (आंध्र प्रदेश)
  • अरविंद मेनन (दिल्ली)
  • पंकजा मुंडे (महाराष्ट्र)
  • डॉ. नरेंद्र सिंह रैना (पंजाब)
  • डॉ. अल्का गुर्जर (राजस्थान)
  • अनुपम हाजरा (पश्चिम बंगाल)
  • ओमप्रकाश धुर्वे (मध्य प्रदेश)
  • ऋतुराज सिन्हा (बिहार)
  • आशा लाकडा (झारखंड)
  • कामख्या प्रसाद तासा (आसाम)
  • सुरेंद्र सिंह नागर (उत्तर प्रदेश)
  • अनिल अंटोनी (केरळ)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा