अनधिकृत बांधकामाप्रकरणी कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. गुडांना कशी शिक्षा दिली जाते, ते माहिती आहे, असे कोलकाता उच्च न्यायालयाने खडसावले आहे. तसेच, अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गरज पडल्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून बुलडोझर उसने मागा, असा सल्ला कोलकाता उच्च न्यायालयाचे न्या. अभिजित गंगोपाध्याय यांनी कोलकाता पोलिस आणि महापालिकेला दिला आहे.
कोलकातामधील मानिकतला परिसरातील अनधिकृत बांधकामाविरुद्ध दाखल याचिकेवर न्या. गंगोपाध्याय यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. अवैध बांधकामाविरोधात याचिका दाखल केल्याने याचिकाकर्त्या महिलेला असुरक्षित वाटते आहे, असे या महिलेच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावेळी न्या. गंगोपाध्याय यांनी कोलकाता पोलिसांचे कौतुकही केले. गुंडांना कसे वठणीवर आणायचे, हे पोलिसांना चांगलेच माहीत आहे, असे गंगोपाध्याय यांनी नमूद केले. या प्रकरणी आता पुढच्या शुक्रवारी सुनावणी होईल.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार
चिन्ह, नावाबाबत ठाकरे हतबल पवार सुशेगात
मोहरमच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू
पुरोगामी कुबेरगिरी कोरड्या ओकाऱ्या
न्या. गंगोपाध्याय आधीही चर्चेत
न्या. गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालमदील शाळा घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना एका वाहिनीला मुलाखत दिल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या नाराजीचा सामनाही करावा लागला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडून हा खटला मागे घेतला होता. या प्रकरणी ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी याने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.