32 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषपुरोगामी कुबेरगिरी कोरड्या ओकाऱ्या

पुरोगामी कुबेरगिरी कोरड्या ओकाऱ्या

‘आजमीला जाम ठोकला’, हे ट्वीट आजमीला झोंबले नसेल तितके लोकसत्ताकारांना झोंबले.

Google News Follow

Related

जे जे हिंदूविरोधी आहे, ते ते कुरवाळणारा आणि चाटणारा पत्रकारांचा एक गट मराठी पत्रकारितेत आहे. ही मंडळी स्वत:ला पुरोगामी म्हणवतात. हिंदुत्वाच्या विरोधासाठी शेण खाण्याचीही त्यांची तयारी असते आणि अल्पसंख्यकांसमोर वाकण्यासाठी अग्रलेख मागे घेण्याचीही त्यांची तयारी असते. महाराष्ट्रातील आद्य यूटर्न संपादक गिरीश कुबेर अशा पत्रकारितेचे मेरूमणी आहेत. सध्या त्यांना सातत्याने हिंदूविरोधी गरळ ओकणाऱ्या अबू असीम आजमीचा मोठा पुळका आलेला दिसतोय.

 

विधानसभेसारख्या अत्यंत पवित्र व्यासपीठावरून नित्यनियमाने हिंदूविरोधी गरळ ओकणे हा या आजमीचा धंदाच आहे. काल परवा त्याने विधानसभेत वंदे मातरम म्हणणार नाही, असा हेका धरला. हे कट्टरतावादी चाळे लोकसत्ताकारांना कधी बोचत नाहीत. परंतु या चाळ्यांवरून कोणी जर आजमीसारख्यांना हाणले तर मात्र यांची लाहीलाही होते. आजमी विधान सभेत हिंदूविरोधी गरळ ओकतो. बहुधा म्हणूनच पुरोगामी कुबेरांना त्याच्याबद्दल प्रचंड ममत्व आहे. अबू आजमीला कोणी ठोकले, तर कुबेरांची भारी चिडचिड होते. त्यांना लगेच बाळंतीणीसारख्या कोरड्या ओकाऱ्या होऊ लागतात.

 

म्हणे मजहब मुझे इजाजत नही देता. वंदे मातरम म्हणायला घटनेने सांगितलेले नाही, असा युक्तिवाद आजमी करतात. कट्टरतावादाच्या बुरख्या आड दडलेला प्रत्येक राजकीय नेता या युक्तिवादाचा भरपूर वापर करताना दिसतो. परंतु पवित्र घटनेची ढाल करून चाललेले हे चाळे लोकांनाही आता व्यवस्थित कळू लागले आहेत. वंदे मातरम् या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा आहे. मां तुझे सलाम… या हिंदी गीताला संगीत देणारा ए.आऱ.रहमान हा संगीतकार आहे. त्याचा आणि आजमींचा मजहब एकच आहे. मग जे रहमान करू शकतो, ते आजमी का करू शकत नाहीत? मशीदीवर भोंगे लावा, रस्त्यावर नमाज पढा, असेही घटनेत कुठे म्हटलेले नाही, आजमींना ते चालते ना?

हे ही वाचा:

गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठाणे जिल्ह्यात २१.८८ हेक्टर जमीन उपलब्ध

पुण्यात गेल्या ७ महिन्यात ६५ सराईत गुन्हेगार हद्दपार

ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान भारतात पाठवतोय अमली पदार्थ

म्यानमारमधून आलेल्या निर्वासितांचे बायोमेट्रिक्स जमा करणार

एक पाप पचले की दुसरे करायला माणूस धजावतो. याच आजमीने कश्मीरात फक्त ८९ हिंदूंच्या हत्या झाल्या असे बेशरम विधान केले. त्यांच्या वाक्यातल्या ‘फक्त’मध्ये दडलेले विष भाजपा आमदार अतुल भातखळकर, प्रदीप जयस्वाल यांच्या लक्षात आले आणि त्या मुद्द्यावरून त्यांनी आजमीची लक्तरे काढली. आमदार भातखळकर यांनी विधानसभेतला व्हीडीयो अपलोड करून ‘आजमीला जाम ठोकला’, असे ट्वीट केले. ते ट्वीट आजमीला झोंबले नसेल तितके लोकसत्ताकारांना झोंबले. आमदार भातखळकर यांचा एकेरी उल्लेख करत आणि आजमींबाबत पुरेपुर आदर व्यक्त करत त्यांनी मथळा सजवला. अबू आजमींबरोबरच्या वादानंतर भाजपा आमदाराची पोस्ट चर्चेत…

 

 

अबू आझमींबाबत लोकसत्ताकारांनी प्रगाढ आदर बाळगावा, त्यांच्या दारावर रोज सकाळ संध्याकाळी धूप आरती करावी, परंतु अतुल भातखळकर यांच्यासारख्या भाजपाच्या अभ्यासू आमदाराचा उल्लेख मथळयात एकेरी करण्याचे कारण काय? ज्या मुद्द्यावरून भातखळकर यांनी आजमींना हाणले, ती भूमिका खरे तर लोकसत्ताकारांनी घ्यायला हवी होती. इतकी परखड भूमिका घेण्याची हिंमत होत नसेल तर किमान दुसऱ्याने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करायला हवे होते, परंतु मथळ्यामध्ये भातखळकरांना एकेरी उल्लेख करून लोकसत्ताकारांनी कंड शमवून घेतला. कश्मीर खोऱ्यात होणाऱ्या हिंदूंच्या हत्येबाबत आजमीसारख्या फडतूस राजकारणी बेताल बोल बोलतो, त्यामुळे जर तुम्हाला संताप येत नसेल तर तुमच्यात आणि त्याच्यात फरक काय?

 

मुळात ज्या वर्तमानपत्राचा संपादक कुबेरांसारखा माणूस आहे, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करावी. नाव मोठं आणि लक्षण खोटे. अग्रलेख मागे घेणारा जगातली पहिला संपादक होण्याचा मान त्यांच्याकडे आहे, दुसऱ्याचे लेख अनुवादीत करून स्वत:च्या नावावर खपवताना हा माणूस रंगेहाथ पकडला गेला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाचा झालेला बभ्रा लक्षात घेऊन एखादा शरमेने काळानिळा पडला असता. त्या घटनेनंतर म्हणे गेंडे एकमेकांना सांगू लागले, तुमची कातडी अग्रलेख मागे घेणाऱ्या संपादकांसारखी जाड झाली आहे. अर्थात याची पुष्टी होऊ शकत नाही, कारण महाराष्ट्रात गेंड्यांची भाषा फक्त पक्षप्रमुखांना कळते. त्यामुळे त्यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल.

 

चुकीची आकडेवारी आणि तपशील देण्याचे यांचे धंदे सोशल मीडियावर सातत्याने उघडे पाडून यांचे किती तरी वेळा वस्त्रहरण करण्यात आले आहे. इतक्या भानगडी केल्यानंतर सुद्धा विचारवंत म्हणून मिरवणारा हा माणूस. वर्तमानपत्रातल्या बातम्या संपादक लिहीत नाहीत. परंतु संपादकाची भूमिका काय, संपादकाचा आवडता कोण, नावडता कोण, कोणाला ठोकल्यावर संपादक खूष होतो, हे सर्वासाधारणपणे बातम्यांचा रतीब घालणाऱ्या पत्रकारांना ठाऊक असते, तशाच बातम्या पाडल्या जातात.

 

यांच्या प्रत्येक बातमीत यांची मानसिकता ठसठशीतपणे समोर येते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या राजभवनातील सांस्कृतिक कार्यक्रमावर २४ लाखांचा खर्च… ही यांची शोध पत्रकारीता. अहो, मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहेत. सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या कर्तृत्ववान महिला आहे त्या. राज्यसभेच्या उमेदावारीकडे आशाळभूत नजर लावून बसलेला बिनकण्याचा, उचलेगिरी करणाऱ्या संपादक नाहीत, एवढे तरी बातम्या देताना लक्षात घ्यायला हवे.

 

अर्थात एखाद्या वर्तमानपत्राची बातमीदारी आणि अग्रलेख त्यांचा दर्जा सिद्ध करत असतात. अग्रलेख मागे घेणारा संपादक ज्या वर्तमानपत्राची दिशा ठरवतोय, त्यांच्याकडून दर्जाची काय अपेक्षा करणार? वर्तमानपत्राचे पोतेरे करणाऱ्या अशा संपादकांची योग्यता, पात्रता आणि वैचारीक उंची लोक ओळखून आहेत. परंतु तरीही अध्येमध्ये यांना आरसा दाखवण्याची गरज असते. मापात राहा, हे सांगण्याची गरज असते.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा