कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतरिम जामीन दिला आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयाने त्यांना बुधवार, २६ जुलै रोजी दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.
कोळसा घोटाळा प्रकरणी या दोघांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. १३ जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवलं होतं. जे एल डी यवतमाळ यांना १९९९ ते २००५ या कालावधीमध्ये जे जुने ब्लॉक देण्यात आले होते त्याची माहिती लपवून पुन्हा युपीए सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळावल्याचा आरोप होता. या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. याच आधारावर ही शिक्षा सुनावण्यात आली होती. अखेर विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे.
यात राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणात एच. सी. गुप्ता आणि इतर दोन अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जेएलडी यवतमाळला न्यायालयाने ५० लाखांचा दंडही ठोठावला आहे.
हे ही वाचा:
‘नवीन नाव पण तेच चेहरे, तीच पापे’
भारताचा वेस्ट इंडिजवर पाच विकेट राखून विजय
इंडिगोच्या विमानात महिलेचा विनयभंग; प्राध्यापकास अटक
विकृतीची हद्दपार; आयफोन विकत घेण्यासाठी पोटच्या मुलाला विकलं
छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे.